केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर अनेकांची चौकशी सुरू आहे. पुणे पोलिसांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याची १० तास चौकशी केली. या चौकशीत साहिलने त्याच्या बहिणीचे सियाचे दावे फेटाळून लावले आहेत. 

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने लोहगड किल्ल्यावरुन ढकलून त्याची हत्या केली. सिया गोयल ही केतनची होणारी पत्नी होती. पण सियाचं तिचा प्रियकर चेतन चौधरी या तरुणावर प्रेम होतं. दोघांनी आपल्या प्रेमासाठी केतनला संपवण्याचा कट केला होता. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिया आणि चेतनने केतनची हत्या केली, पण सुरुवातीला केतनचा मृत्यू हा केवळ अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र सियाच्या संशयास्पद हालचाली, हावभाव यावरुन केतनच्या कुटुंबियांना संशय आला आणि पोलिसांत याप्रकरणी नोंद करण्यात आली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पोलिसांनी प्रकरणाची खोलवर चौकशी केल्यानंतर धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. केतनचा अपघातील मृत्यू नाही, तर त्याला मुद्दाम मारल्याचं, हत्या केल्याचं समोर आलं. सध्या पोलिसांनी सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी सियाच्या भावाची साहिल गोयलची पोलिसांनी १० तास चौकशी केली. या चौकशीत त्याने दिलेल्या माहितीने महत्त्वाच्या बाबी उघड आल्या आहेत.

सिया आणि चेतन दोघं कोठडीत असून दोघांची चौकशी सुरू असताना दोघांनीही एकमेकांवर केतनच्या हत्येसाठी ते कसे जबाबदार आहेत असं सांगत आरोप केले आहेत. प्रेमासाठी दोघांनी केतनला संपवलं, पण आता कोठडीत मात्र दोघं आपल्या बचावासाठी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आपला उद्देश सियासोबत पळून जाण्याचा होता, त्याला मारण्याची कल्पना सियाची होती असं चेतनने पोलिसांना सांगितलं. तर चेतनचं केतनच्या हत्येसाठी जबाबदार असून त्यानेच आपल्याला त्याला मारण्याबाबत सांगितलं, असा आरोप सियाने केला आहे.

यादरम्यान पोलिसांनी सियाच्या भावाची साहिल गोयलची चौकशी केली. पुणे पोलिसांनी १० तास केलेल्या चौकशीत साहिलने बहिणीने केलेले दावे फेटाळून लावले आहेत. सियाने पोलिसांना तिला केतन पसंत नसल्याचं आपल्या घरी सांगितलं होतं अशी माहिती दिली, पण तिच्या भावाने ही बाब स्पष्टपणे नाकारली आहे. साहिलने सियाचा दावा फेटाळत तिने कधीही मला किंवा कुटुंबातील कोणालाही केतन पसंत नाही असं सांगितलं नव्हतं. तिने केतन पसंत नसल्याचं सांगितलं असतं, तर तिचं कधीच लग्न लावलं नसतं अशी माहिती तिच्या भावाने साहिलने दिली आहे.

दरम्यान, साहिलच्या चौकशीनंतर पोलीस सियाच्या आई-वडिलांचाही जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे. आई-वडिलांच्या चौकशीत आणखी काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.