बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा कॅन्सरशी लढा, लोकसभा निवडणूक प्रचारात होणार नाहीत सहभागी

| Published : Apr 03 2024, 01:40 PM IST / Updated: Apr 03 2024, 01:42 PM IST

sushil  modi

सार

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आज सोशल मीडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आज सोशल मीडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "गेल्या सहा महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज घेत आहेत आणि त्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकणार नाहीत. माझ्या तब्येतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

भाजपच्या जाहीरनामा समितीत कोण? 
बिहारमधील राज्यसभा खासदाराने याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली. बिहारमध्ये सुशील मोदी राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. भाजपच्या जाहीरनामा समितीचा राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल या समितीत आहेत. 

सुशील मोदी कोण आहेत?
सुशील मोदी हे बिहारमधील भाजपचे महत्वाचे नेते आहेत. ते बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते भारतातील अशा काही मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत जे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तसेच विधान परिषद आणि विधानसभेत गेले आहेत. बिहारमधील लोकसभेच्या जागांसाठी 19 एप्रिल ते 1 दरम्यान निवडणुका पार पडणार आहेत. येथे सात टप्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. 
आणखी वाचा - 
दिल्ली दारू प्रकरणः आपचे खासदार संजय सिंह हॉस्पिटलमध्ये दाखल, त्यांच्या पत्नीने माध्यमांना दिली प्रतिक्रिया
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, 4.5 किलो वजन झाले कमी