- Home
- Maharashtra
- HSC-SSC Exam 2026: दहावी-बारावीच्या परीक्षा कधी? संपूर्ण वेळापत्रक आणि तयारीसाठी आवश्यक माहिती येथे वाचा!
HSC-SSC Exam 2026: दहावी-बारावीच्या परीक्षा कधी? संपूर्ण वेळापत्रक आणि तयारीसाठी आवश्यक माहिती येथे वाचा!
HSC-SSC Exam 2026: शिक्षण विभागाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणारय.

दहावी-बारावीच्या परीक्षा तारखा जाहीर
मुंबई: राज्यातील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या 2025-26 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा फक्त शैक्षणिकच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरवणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा असल्यामुळे, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.
लेखी परीक्षा कधीपासून?
बारावी (HSC):
10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
दहावी (SSC):
20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
याच काळात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देखील पार पडणार आहेत.
तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा
बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा:
23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026
दहावी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा:
2 ते 18 फेब्रुवारी 2026
वेळापत्रक इतकं लवकर का जाहीर केलं जातं?
दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षा देतात. त्यामुळे परीक्षा केंद्रांची आखणी, उत्तरपत्रिकांचे व्यवस्थापन, शिक्षक व निरीक्षकांची नियुक्ती, आणि अभ्यासाचे नियोजन या साऱ्या गोष्टी वेळेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग वेळापत्रक आधीच जाहीर करतो.
यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना नियोजनपूर्वक अभ्यास करता येतो, शाळांना सराव परीक्षा, मार्गदर्शन सत्रं आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नीट वेळ देता येतो.
विद्यार्थ्यांनी आता अभ्यास सुरू करावा!
वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शाळा आणि शिक्षक आपल्या पातळीवर योग्य शैक्षणिक तयारी करू शकतात. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनीही उशीर न करता अभ्यासाला सुरुवात करावी, असा स्पष्ट संदेश शिक्षण विभागाने दिला आहे.
लवकरच विषयानुसार वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार
परीक्षांचे सविस्तर विषयानुसार वेळापत्रक लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

