- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे ₹1500 जमा झालेत का?, मोबाईलवर घरबसल्या कसं चेक करायचं?; जाणून घ्या
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे ₹1500 जमा झालेत का?, मोबाईलवर घरबसल्या कसं चेक करायचं?; जाणून घ्या
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ₹1500 चा पंधरावा हप्ता दिवाळीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. पैसे जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट, बँक स्टेटमेंट किंवा SMS चा वापर करता येतो.

लाडकी बहीण योजनेचे ₹1500 आले की नाही?
Ladki Bahin Yojana: दिवाळीचे दिवस जवळ आले आहेत आणि यासोबतच "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना"च्या लाभार्थींमध्येही उत्सुकता वाढली आहे. पुढचा ₹1500 चा हप्ता बँकेत जमा झाला की नाही? हीच विचारणा सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 13 ऑक्टोबरपर्यंत पात्र लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे.
₹1500 चा 15 वा हप्ता, आज येऊ शकतो!
राज्य सरकारकडून "लाडकी बहीण" योजनेअंतर्गत दरमहिना ₹1500 चा सन्मान निधी दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे १४ हप्ते वितरित करण्यात आले आहेत, तर आता १५ वा हप्ता येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक बहिणींच्या खात्यात पैसे पोहोचले असून, इतर लाभार्थ्यांनाही लवकरच रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
पैसे आले की नाही? असे चेक करा
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://ladakibahin.maharashtra.gov.in
येथे लॉगिन करून तुमचा ई-केवायसी आणि हप्त्याचा स्टेटस पाहू शकता.
बँक खात्याचे स्टेटमेंट तपासा:
नेट बँकिंग किंवा मोबाईल अॅपमधून बघा – ‘MJP LADKI BAHIN’ अशा नावाने ट्रान्सफर दिसू शकते.
SMS अलर्ट तपासा:
बँकेकडून एसएमएस सेवा सुरू असेल तर पैसे जमा झाल्यानंतर मेसेज येतो.
नजीकच्या बँकेत किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात चौकशी करा.
ई-केवायसी अनिवार्य, लक्षात ठेवा!
पुढील हप्ते नियमितपणे मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. विवाहित लाभार्थींनी पतीचे PAN कार्ड, तर अविवाहित लाभार्थींनी वडिलांचे PAN कार्ड वापरून केवायसी पूर्ण करावी लागेल. यंत्रणेतील पारदर्शकतेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर पुढचे हप्ते थांबवले जाऊ शकतात.
दिवाळीपूर्वी दिलासा, योजनेचा हप्ता खात्यात!
दिवाळीचा सण अगदी उंबरठ्यावर असताना, राज्य सरकारचा हा आर्थिक हातभार अनेक बहिणींसाठी उपयोगी ठरणार आहे. सन्मान निधी केवळ आर्थिक मदत नसून, तो महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि आत्मनिर्भरतेचा एक मोठा टप्पा आहे.

