- Home
- Maharashtra
- हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची उडवली झोप, २७ सप्टेंबरपासून परत अतिवृष्टी होणार
हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची उडवली झोप, २७ सप्टेंबरपासून परत अतिवृष्टी होणार
मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून ते कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच, हवामान विभागाने २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची उडवली झोप, २७ सप्टेंबरपासून परत अतिवृष्टी होणार
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाहून गेलं असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची लवकरात लवकर मदत करावी आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी केली जात आहे.
मराठवाड्यात पावसाने घातला हैदोस
संपूर्ण मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या शेतामध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं. मका, कापूस, तूर यासारखी पिके मुसळधार पावसामुळे वाहून गेली आहेत. पावसाच्या या रौद्र रुपाचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
परत एकदा महाराष्ट्रात पाऊस बरसणार
परत एकदा महाराष्ट्रात पाऊस बारसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने हा नवा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी राजा परत एकदा संकटात सापडला आहे.
राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार
राज्यामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.
शहरी भागात कामाला जाणाऱ्यांनी जीवाला जपावे
शहरी भागात कमला जाणाऱ्यांनी जीवाला जपावे असं सांगण्यात आलं आहे. अचानक पूरपरिस्थिती उदभवल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात शेतकऱ्यांचं झालं नुकसान