- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास धोक्याचे, १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास धोक्याचे, १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, विदर्भ आणि काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत! भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
the heavy rainfall activity over Maharashtra is very likely to continue during 16-21 August 2025. The following weather is very likely: pic.twitter.com/KoBBwZzYUT
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 16, 2025
विभागांनुसार हवामानाचा अंदाज
कोकण आणि मुंबई
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे, कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडू शकतो. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज असून, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे, या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हे सर्व अंदाज लक्षात घेऊन, नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

