MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • FASTag Annual Pass: महाराष्ट्रातील 'या' 96 टोलनाक्यांवर मोफत प्रवासाची संधी!, जाणून संपूर्ण यादी

FASTag Annual Pass: महाराष्ट्रातील 'या' 96 टोलनाक्यांवर मोफत प्रवासाची संधी!, जाणून संपूर्ण यादी

Maharashtra Toll Naka Annual Pass: १५ ऑगस्ट २०२५ पासून FASTag वापरकर्त्यांसाठी ₹३००० मध्ये वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. या पासद्वारे वाहनचालकांना २०० ट्रिप्स किंवा एक वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. 

3 Min read
Rameshwar Gavhane
Published : Aug 16 2025, 08:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : stockPhoto

Maharashtra Toll Naka Annual Pass: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! राज्यभरातील 96 टोल नाक्यांवर FASTag वार्षिक पासच्या माध्यमातून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

26
Image Credit : Freepik

15 ऑगस्टपासून सुरू होणारी सुविधा

15 ऑगस्ट 2025 पासून FASTag वापरकर्त्यांसाठी वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. फक्त ₹3000 मध्ये मिळणाऱ्या या पासद्वारे वाहनचालकांना 200 ट्रीप्स अथवा एक वर्षासाठी मोफत टोलची सुविधा मिळणार आहे. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे साठी लागू असेल. मात्र, राज्य महामार्ग किंवा महानगरपालिकांच्या टोल नाक्यांवर हा पास लागू होणार नाही.

Related Articles

Related image1
आज 16 ऑगस्टला बँका बंद आहेत का? जन्माष्टमीची सुट्टी आहे का? जाणून घ्या
Related image2
PM Viksit Bharat Rozgar Yojana: आजपासून अंमलात, पहिल्या नोकरीवर तरुणांना मिळणार ₹15,000 प्रोत्साहन रक्कम
36
Image Credit : Asianet News

या जिल्ह्यांतील वाहनधारकांना मोठा लाभ

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, बुलढाणा, अकोला, परभणी आदी जिल्ह्यांतील नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

46
Image Credit : AI Generated Image

या 96 टोलनाक्यांवर पास वापरता येईल!

१. चारोटी - सुरत-दहिसर

२. खानीवाडे - सुरत-दहिसर बायपास

३. अहमदनगर बायपास - अहमदनगर बायपास

४. तिडगुंडी - सोलापूर-विजापूर

५. तसावडे - सातारा-कागळ

६. किणी - सातारा-कागळ

७. सावळेश्वर - पुणे-सोलापूर

८. वरवडे - पुणे-सोलापूर

९. पाटस - पुणे-सोलापूर

१०. सरडेवाडी - पुणे-सोलापूर

११. आनेवाडी - खंडाळा-सातारा

१२. खेड-शिवपूर - वेस्टर्ली डायव्हर्जन टू पुणे, कात्रज रियललाइनमेंट आणि कात्रज-सारोळे

१३. चांदवड - पिंपळगाव-धुळे

१४. लालींग - पिंपळगाव-धुळे

१५. बसवंत - पिंपळगाव-नाशिक-गोंडे

१६. घोटी - वडापे-गोंडे

१७. अर्जुनल्ली - वडापे-गोंडे

१८. तामलवाडी - सोलापूर-येडशी

१९. येडशी - सोलापूर-येडशी

२०. धोकी - एंड ऑफ आणे घाट टू स्टार्ट ऑफ अहमदनगर

२१. दुमहरवाडी - माळशेज घाट टू आणे घाट

२२. हिवरगाव पावसा - खेड-सिन्नर

२३. फुलवाडी - सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर

२४. तळमोड - सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर

२५. चाळकवाडी - खेड-सिन्नर

२६. वळसांग - अक्कलकोट-सोलापूर

२७. नंदानी - सोलापूर-विजापूर

२८. चाचाडगाव - नाशिक-पेठ

२९. अनकधाळ - सांगली-सोलापूर (पॅकेज-१)

३०. बोरगाव - सांगली-सोलापूर (पॅकेज-१)

३१. इचगाव - सांगली-सोलापूर (पॅकेज-३)

३२. पिंपरवाळे - सिन्नर-शिर्डी

३३. डोंगराळे - कुसुंबा ते मालेगाव

३४. पेनूर - मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस

३५. पिंपरखेड - चाळीसगाव-नांदगाव-मनमाड

३६. उंडेवाडी - पाटस-बारामती

३७. बंपिप्री - अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर

३८. निमगाव खालू - अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा

३९. पंडणे - सरद-वाणी पिंपळगाव

४०. बावडा - इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)

४१. भवानीनगर - खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद

४२. बडेवाडी - खरवडी कासार-जंक्शन

४३. गोंधखैरी - नागपूर-कोंढळी

४४. करंजा घाडगे - कोंढळी-तळेगाव

४५. निंभी - नांदगाव पेठ-मोरशी

४६. नांदगाव पेठ - तळेगाव-अमरावती

४७. कुरणखेड - अमरावती-चिखली (पॅकेज-१)

४८. तरोडा कसबा - अमरावती-चिखली (पॅकेज-३)

४९. उंद्री - खामगाव-चिखली

५०. तुप्तकळी - आरणी-नायगाव बांधी

५१. मेडशी-सावरखेडा - अकोला-मेडशी (पॅकेज-१)

५२. धुम्का-तोंडगाव - मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)

५३. करोडी - औरंगाबाद-करोडी

५४. हातनूर - करोडी-तेलवाडी

५५. माळीवाडी-भोकरवाडी - येडशी-औरंगाबाद

५६. पादळसिंगी - येडशी-औरंगाबाद

५७. पारगाव - येडशी-औरंगाबाद

५८. वैद्याकीन्ही - मांजरसुम्बा-चुंभळीफाटा

५९. नायगाव - मंठा-पातुर

६०. लोणी - परतूर-माजलगाव

६१. शेंबळ - वरोरा-वणी

६२. हिरापूर - गडचिरोली-मूल

६३. खरबी - नागभीड-आर्मोरी

६४. केलापूर - वडनेर देवधरी केळापूर

६५. हुस्नापूर - यवतमाळ-वर्धा

६६. निअर हळदगाव - वर्धा-बुटीबोरी

६७. वडगाव - कळंब राळेगाव वडकी

६८. उमरेड - कळंब राळेगाव वडकी

६९. सोंगिर - एमपी/एमएच बॉर्डर - धुळे

७०. शिरपूर - एमपी/एमएच बॉर्डर - धुळे

७१. बोरविहीर - बोध्रे-धुळे

७२. दासरखेड - नांदुरा ते चिखली

७३. नाशिराबाद - चिखली ते तारसोड

७४. सुबगव्हाण - तारसोड ते फागणे

७५. दरोडा - बोरखेडी-जाम-वडनेर

७६. नंदुवाफा - सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज

७७. बोरखेडी - नागपूर हैदराबाद

७८. पांजरि - नागपूर बायपास

७९. खुमारी - एमपी/एमएच बॉर्डर नागपूर

८०. कामठी कन्हान - कामठी कन्हान बायपास नागपूर

८१. मठानी - नागपूर ते वैनगंगा

८२. सेलू - सावनेर-धापेवाडा-काल्मेश्वर गोंडखैरी

८३. चंपा - नागपूर-उमरेड

८४. भागेमारी - नागपूर-बैतुल

८५. मिलानपूर - नागपूर-बैतुल

८६. खांबारा - नागपूर-बैतुल

८७. खडका - रिंग रोड नागपूर पॅकेज - १

८८. पावनगाव - रिंग रोड नागपूर पॅकेज - २

८९. सेलू अंबा - लोखंडी सावरगाव ते रेणापूर

९०. अष्टा - औसा ते चाकूर

९१. मालेगाव - चाकूर ते लोहा

९२. परडी माक्ता - लोहा ते वारंगफटा

९३. बिजोरा - वारंगा ते महागाव

९४. आशीव - तुळजापूर ते औसा

९५. सालावा झारोडा - पांगारे ते वारंगा फाटा

९६. भांब राजा - महागाव ते यवतमाळ

56
Image Credit : Asianet News

काय फायदे होतील?

वर्षभर टोल फीमधून बचत

लांब पल्ल्याच्या प्रवासात दिलासा

FASTag द्वारे सहज टोल पेमेंट

राष्ट्रीय महामार्ग प्रवास अधिक सोयीचा

66
Image Credit : Gemini AI

सावधगिरी

हा पास फक्त राष्ट्रीय महामार्गांवर लागू होईल

स्थानिक, पालिकांच्या किंवा राज्य महामार्गांवरील टोल नाक्यांवर लागू होणार नाही

पास जारी करताना वाहन क्रमांक, FASTag अकाउंट लिंक करणे आवश्यक

तुम्हाला काय करावे लागेल?

FASTag पोर्टलवर लॉग इन करा

वार्षिक पासचा पर्याय निवडा

₹3000 शुल्क भरून पास अॅक्टिव्ह करा

यादीतील 96 टोलनाक्यांवर मोफत प्रवास करा!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
Recommended image2
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
Recommended image3
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
Recommended image4
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
Recommended image5
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
Related Stories
Recommended image1
आज 16 ऑगस्टला बँका बंद आहेत का? जन्माष्टमीची सुट्टी आहे का? जाणून घ्या
Recommended image2
PM Viksit Bharat Rozgar Yojana: आजपासून अंमलात, पहिल्या नोकरीवर तरुणांना मिळणार ₹15,000 प्रोत्साहन रक्कम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved