- Home
- Maharashtra
- Ganesh Chaturthi 2025: कोकणात जायचंय पण तिकीट नाही मिळत?; रेल्वेकडून गणेशभक्तांसाठी खास गाड्या, पाहा वेळापत्रक
Ganesh Chaturthi 2025: कोकणात जायचंय पण तिकीट नाही मिळत?; रेल्वेकडून गणेशभक्तांसाठी खास गाड्या, पाहा वेळापत्रक
Ganesh Chaturthi 2025: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत धावणाऱ्या या गाड्यांचे वेळापत्रक, थांबे यांची माहिती उपलब्ध आहे.

मुंबई : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली असून, मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही तिकीट मिळवणं हे चांगलंच अवघड ठरत आहे. विशेषत: गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण क्षणात फुल्ल झाल्यानं अनेक भक्त अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची घोषणा!
गणपतीसाठी रेल्वेचं खास गिफ्ट, पनवेल ते चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित गाड्या
कोकणात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाची गरज लक्षात घेता, रेल्वेने 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत कोकण मार्गावर विशेष अनारक्षित गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पनवेल–चिपळूण दरम्यान धावणाऱ्या 6 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.
पनवेल – चिपळूण गणेशोत्सव अनारक्षित गाड्यांचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 01159 – पनवेल ते चिपळूण
प्रवास दिनांक: 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025
निघण्याची वेळ: संध्याकाळी 4:40 वाजता (पनवेलहून)
पोहोचण्याची वेळ: रात्री 9:55 वाजता (चिपळूण)
गाडी क्रमांक 01160 – चिपळूण ते पनवेल
प्रवास दिनांक: 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025
निघण्याची वेळ: सकाळी 11:05 वाजता (चिपळूणहून)
पोहोचण्याची वेळ: दुपारी 4:10 वाजता (पनवेल)
या गाड्यांना कोकण रेल्वेवरील खालील स्थानकांवर दिला जाईल थांबा
कोलाड, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी
तिकीट माहिती कुठे मिळेल?
या गाड्यांबाबतची सविस्तर माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर, रेल वन अॅपवर तसेच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर उपलब्ध आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी प्रवास सुलभ!
गणेशोत्सव हा कोकणातील भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी रेल्वे आणि एसटीमध्ये प्रचंड गर्दी होते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने केलेली ही अनारक्षित गाड्यांची विशेष व्यवस्था अनेक चाकरमान्यांसाठी वरदान ठरणार आहे. ज्यांना अद्याप आरक्षण मिळालं नाही, त्यांच्यासाठी ही संधी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांची माहिती तपासून ठेवावी आणि आपल्या बाप्पाच्या भेटीसाठी नियोजन करावे!

