सार

सुप्रीम कोर्टाने गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांमध्ये मोठी सूट दिली आहे. ढोल-ताशा पथकांवरील मर्यादा हटवत, आता गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहे.

सुप्रीम कोर्टाने गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरीत लवादाने दिलेल्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हरीत लवादाने आदेश दिला होता की, ढोल-ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाने या आदेशाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी पार पडली. सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

सुप्रीम कोर्टाने 17 सप्टेंबरच्या गणपती विसर्जन दिवशी मोठ्या आवाजात पथकांसाठी परवानी दिली आहे. याचा अर्थ, गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी ढोल-ताशांचा गजर ध्वनी प्रदूषणाच्या नियमांच्या पलीकडे जाऊ शकतो. यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठा दिलासा मिळालेला आहे.

वकील सिद्धार्थ शिंदे यांची प्रतिक्रिया

वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या मते, "हरीत लवादाच्या आदेशाने ध्वनी प्रदूषणावर अटी लावण्यात आल्या होत्या. परंतु 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या अटी लागू होणार नाहीत. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, एकदिवसाच्या उत्सवासाठी नियम लागू करणे चुकीचे आहे. त्यामुळे गणपती विसर्जन जोरात होईल."

या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात अडथळा येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : आता घरबसल्या पुण्यातील मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन!