सार
तमिळनाडूचे खासदार ए. गणेशमूर्ति यांचे निधन झाले आहे. दोन दिवसांआधी निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट न दिल्याने विष प्राशन करत गणेशमूर्ति यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
A. Ganeshamurthi Died : तमिळनाडूचे (Tamil Nadu) खासदार गणेशमूर्ति यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर गणेशमूर्ति यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले होते. अशाच गणेशमूर्ति यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) निधन झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, इरोड येथील विद्यमान खासदार एमडीएमकेच्या गणेशमूर्ति यांचे गुरुवारी (28 मार्च) सकाळी निधन झाले आहे.
खासगी रुग्णालायत सुरू होते उपचार
पोलिसांनुसार, तमिळनाडूमधील इरोड येथून वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमकेच्या तिकीटावरुन निवडण्यात आलेल्या गणेशमूर्ति यांची प्रकृती बिघडली गेली. यानंतर 24 मार्चला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर गणेशमूर्ति यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले.
यानंतर खासदारांना कोयंबटूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राज्यातील शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री एस मुथुसामी, मोदाकुरिची येथील भाजप आमदार डॉ. सी सरस्वती आणि अन्नाद्रमुक नेते केवी रामलिंगम यांच्यासह काही राजकीय नेत्यांनी गणेशमूर्ति यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली होती.
या गोष्टीमुळे नाराज होते खासदार
तीन वेळा खासदार राहिलेले गणेशमूर्ति एमडीएमकेच्या दोन प्रमुख पदांवर राहिले होते. कथित रुपात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इरोड जागेवरून पक्षाने गणेशमूर्ति यांचे तिकीट कापल्याने ते नाराज होते. डीएमकेने इरोड येथून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि तिरुचि जागा एमडीएमकेला देण्याचा निर्णय घेतला. एमडीएमकेचे सरचिटणीस वाइको यांचा मुलगा दुरई वाइको याला तिरुची जागेवरून पक्षाने तिकीट दिले आहे.
आणखी वाचा :