एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

| Published : Dec 03 2024, 02:04 PM IST / Updated: Dec 03 2024, 09:10 PM IST

eknath shinde new

सार

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अजूनही बरी नाही. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी पांढऱ्या पेशींमध्ये चढउतार असल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Maharashtra Elections 2024: महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. परंतु महायुतीचे नेते आणि हंगामी मुख्यमंत्री एकनाथ आजारी आहेत. त्यांची प्रकृती अजूनही बरी नाही. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे.

एकनाथ शिंदेंना डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

दरेगाववरुन दोन दिवसांत एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही. आता ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी ते ज्युपिटर रुग्णालयात पोहचले आहे. यापू्र्वी त्यांची डेंग्यूचा चाचणी केली होती. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने आज ही एकनाथ शिंदे कुठेही बैठकीला जाणार नाही. मात्र दुपारी महापरिनिर्वाहादिन निम्मित अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

 

Read more Articles on