- Home
- Maharashtra
- Diwali 2025: पुणेकरांनो, फटाके वाजवण्यापूर्वी 'ही' पोलीस नियमावली वाचा, नाहीतर होईल थेट कारवाई!
Diwali 2025: पुणेकरांनो, फटाके वाजवण्यापूर्वी 'ही' पोलीस नियमावली वाचा, नाहीतर होईल थेट कारवाई!
Diwali 2025: पुणे पोलिसांनी दिवाळीसाठी फटाके वाजवण्याबाबत नवीन नियमावली जाहीर केली. यानुसार, सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच फटाके वाजवता येतील आणि शांतता क्षेत्रात फटाके वाजवण्यास पूर्ण बंदी आहे.

फटाके वाजवण्यापूर्वी 'ही' पोलीस नियमावली वाचा
पुणे: दिवाळीच्या आनंदात फटाके वाजवायचेच, पण ते नियमात राहून! वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी फटाक्यांबाबत नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश जारी करत पुणेकरांना स्पष्ट इशारा दिला आहे. “नियम तोडला, तर कारवाई टळणार नाही!”
फटाके वाजवण्याची वेळ ठरली!
फक्त सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी.
रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके वाजवण्यावर सक्त मनाई.
हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जारी करण्यात आला आहे.
अत्यंत महत्वाचे नियम, लक्षात ठेवा!
अति मोठा आवाज करणारे फटाके जसे की ॲटमबॉम्ब विक्री, साठवणूक आणि वापर यावर पूर्ण बंदी.
शांतता क्षेत्रात (100 मीटरच्या आत)
रुग्णालये
शाळा व महाविद्यालये
न्यायालये
या परिसरात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस फटाके वाजवण्यावर बंदी.
फटाक्यांचा आवाज मर्यादा
125 डेसिबल पेक्षा अधिक नसावा.
फक्त तात्पुरती विक्री परवानगी
फटाक्यांची विक्री 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यानच परवानगीने करता येणार.
महामार्ग, पूल, आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे किंवा रॉकेट्स उडवणे पूर्णपणे बंद.
नियम मोडल्यास काय होईल?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
"कोणताही नियम मोडल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल."
म्हणून उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करून इतरांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्या.
काय करावे, काय टाळावे?
करावे टाळावे
6am ते 10pm दरम्यान फटाके वाजवा 10pm नंतर फटाके वाजवू नका
कमी आवाजाचे आणि प्रमाणबद्ध फटाके वापरा ॲटमबॉम्ब, रॉकेट्स टाळा
अधिकृत विक्रेत्यांकडून फटाके घ्या महामार्ग, पूल याठिकाणी वापर करू नका
उत्सव साजरा करा… पण जबाबदारीनं!
दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि एकत्र येण्याचा सण. फटाक्यांची मजा घ्या, पण शिस्तीत आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करून. कारण, नियम मोडणं म्हणजे केवळ दंड नव्हे, तर दुसऱ्याच्या आनंदात अडथळा!

