केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची आर्मी स्टाफचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये शिक्षण घेतलेल्या धीरज सेठ यांना सैन्यात जवळपास चार दशकांचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी सुदर्शन चक्र कोरची कमांड आणि दिल्ली येथे जनरल ऑफिसर कमांडिंग यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. आर्मी प्रमुख पदासाठी त्यांच्या नियुक्तीचे आदेश मिळाले आहेत. आर्मीचे स्टाफचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या धीरज सेठ यांनी पुढील आर्मी स्टाफ प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या नवीन कामाची ३० जून २०२६ रोजीपासून सुरुवात होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पुणे येथे झाले शिक्षण 

पुणे येथे धीरज सेठ यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यांचे शिक्षण पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये झाले. त्यांना जवळपास चार दशकांचा आर्मीमध्ये अनुभव असून ऑपरेशनल, स्ट्रॅटेजिक, क्षमता विकास आणि संस्थात्मक क्षेत्रांमध्ये व्यापक अनुभव आहे. भारतीय आर्मीच्या युद्धक्षमता वाढवणे आणि दीर्घकालीन परिवर्तन यामध्ये धीरज यांचा अनुभव मोठा आहे.

आधी कुठं होते कार्यरत 

धीरज सेठ यांनी इंडियन आर्मीमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र कोरची कमांड सांभाळली. त्यानंतर ते दिल्ली येथे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सैन्य सहकार्य आणि औपचारिकता या विभागांमध्ये काम केलं आहे.

सैन्य शिक्षणात केली होती बेस्ट कामगिरी 

सैन्य शिक्षणात धीरज यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी विविध कोर्समध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला होता. तसेच पॅरिसमधील प्रतिष्ठित कमांड अॅण्ड स्टाफ कोर्सला उपस्थित राहिले आहेत. त्यांना सैन्यातील विविध विभागांचा अनुभव असून त्याचा त्यांना आता पुढील वाटचालीत निश्चितच फायदा मिळणार आहे.