- Home
- Maharashtra
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
- FB
- TW
- Linkdin
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून (Koyasan University Of Japan) मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दीक्षांत सभागृहात मंगळवारी (26 डिसेंबर 2023) हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांचा या कार्यासाठी करण्यात आला सन्मान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य व महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्यासाठी कोयासन विद्यापीठाने आपल्या 120 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाबाहेरील व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
“राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासह देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेन”, अशा भावना व्यक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस व्यक्त केल्या.
Humbled and filled with profound gratitude to receive this rare honour of ‘Doctorate in Philosophy’ by the prestigious heritage Koyasan University, Japan.
Grateful to the entire team of Koyasan University and people of Japan for honouring me with One of the Highest Honour in the… pic.twitter.com/DmpCFlXjzK— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 26, 2023
पुढे ते असेही म्हणाले की, “आपल्या राज्याने पायाभूत क्षेत्र विकासासाठी वर्ष 2014मध्ये काम सुरू केले. मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्र सेतू यासह अनेक प्रकल्पासाठी मोठी मदत जपान सरकारने केली आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी-लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे. पूरनियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केले जाणार आहे. आता आपण या क्षेत्रात अशा ठिकाणी आहोत की इतर राज्यांना आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल.”
जपानच्या कोयासान विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट देऊन केलेला हा सन्मान मी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो!@KoyasanUniv @IndianEmbTokyo @ChDadaPatil @dvkesarkar @CGOJMumbai#Mumbai #Maharashtra #MumbaiUniversity #Japan #IndiaJapan #KoyasanUniversity pic.twitter.com/0wkOdzh18e
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 26, 2023
आणखी वाचा :
Dawood Ibrahim : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय, या दिवशी होणार लिलाव
मुंबईत RBIसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, या 2 मोठ्या व्यक्तींच्या राजीनाम्याची केली मागणी