- Home
- Maharashtra
- Covid-19 JN1 Variant : नववर्षाच्या स्वागतानंतर कोरोना वाढण्याचा धोका अधिक, पुढील 15 दिवस सतर्क राहा - आरोग्यमंत्री
Covid-19 JN1 Variant : नववर्षाच्या स्वागतानंतर कोरोना वाढण्याचा धोका अधिक, पुढील 15 दिवस सतर्क राहा - आरोग्यमंत्री
Covid 19 JN1 Variant : नवीन वर्षाच्या स्वागतानंतर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
| Published : Dec 30 2023, 01:26 PM IST / Updated: Dec 30 2023, 01:27 PM IST
- FB
- TW
- Linkdin
आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
Covid 19 JN1 Variant : नवीन वर्षाच्या (New Year 2024) स्वागतासाठी नागरिकांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देतात. पण कोरोनाचा वाढता धोका पाहता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन करणे व काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहनही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
‘पुढील 10 ते 15 दिवस सतर्क राहा’
नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर लोक पुन्हा आपापल्या घरी येतील, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. म्हणून पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनीही सतर्क राहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचवल्या जातील, अशा महत्त्वाच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आली आहे. यानुसार टास्क फोर्सची पहिली बैठक गुरुवारी (28 डिसेंबर 2023) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली.
‘नागरिकांनी काळजी घ्यावी’
कोरोनाचा ‘जेएन-1’ (Covid 19 Alert) हा नवीन व्हेरिएंट घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरून न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे व त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर काय म्हणाले?
- जेएन- 1 या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही.
- तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
- आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
- उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल.