सार
सोशल मीडियावर सध्याच्या काळात कधी कोण काय टाकेल हे सांगता येत नाही. इंस्टाग्राम आणि यु ट्यूबवर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. क्रिएटर्सने एखादा व्हिडीओ टाकल्यास त्यावरून वाद निर्माण होत असतात, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावरील व्हिडीओने केला वाद निर्माण -
सोशल मीडियावरील व्हिडीओने मोठा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये एक क्रिएटर छत्रपती संभाजीनगर येथे असून तो एका व्यक्तीला लिफ्ट मागत असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओमध्ये महत्वाचं म्हणजे तो क्रिएटर एका व्यक्तीला तुम्ही मला लिफ्ट देणार का असं विचारलं असं म्हटलं होत आणि त्यावर ती व्यक्ती हा चला असं म्हणते.
त्यानंतर गाडीवर बसल्यानंतर क्रिएटर हा त्या व्यक्तीच आभार मानून मी छत्रपती संभाजीनगरकडे चाललो असल्याचं सांगतो. त्यावर पुढं तो मुस्लिम व्यक्ती माहिती विचारतो आणि नंतर छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबाद असं सांगून त्याला मी औरंगाबादकडे चाललो असल्याचं सांगतो. या मुद्यावरून हिंदुत्ववादी आणि मुस्लिम लोकांमध्ये वाद निर्माण झाला आहे.