समोसामध्ये भरले कंडोम, दगड आणि तंबाखू; पुण्यातील ऑटो कंपनीमधील किळसवाणा प्रकार उघडकीस

| Published : Apr 09 2024, 12:49 PM IST / Updated: Apr 09 2024, 12:56 PM IST

Condom-stone-and-tobacco-found-in-samosa

सार

पुण्याजवळी पिंपरी-चिंचवड येथील एका कंपनीतील हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथील कंपनीच्या कॅन्टीनमधील समोसामध्ये कंडोम, दगड आणि तंबाखू भरल्याने कर्मचाऱ्यांना धक्का बसला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune :  पुण्यातील एका कंपनीतील कॅन्टनमधील एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. खरंतर, कंपनीतील कॅन्टमध्ये समोसामध्ये बटाट्याच्या भाजीएवजी कंडोम, दगड आणि तंबाखू भरल्याचे समोर आले आहे. यामागील कारण देखील धक्कादायक आहे. प्रकरणात पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथील कॅटालिस्ट सर्विस सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील प्रकरण आहे. येथे आधी SRS एंटरप्राइजेज नावाच्या कंपनीला समोसे तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. यांच्या समोसामध्ये काही दिवसांआधी बॅडेंज आढळून आली होती. यामुळे कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करत मनोहर इंटरप्राइजेज नावाच्या कंपनीला समोसे तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. यामुळे आरएसएस कंपनीचा मालक रहीम शेख संतप्त होत त्याने या प्रकराचा बदला घेण्याचे ठरविले.

रहीमने आपल्याकडीन दोन कर्मचाऱ्यांना मनोहर इंटरप्राइजेजच्या कॅन्टीमध्ये कामासाठी भरती केले. फिरोज शेख आणि विकी शेख या दोन्ही कर्मचाऱ्यांनी समोसामध्ये कंडोम, तंबाखू आणि दगड मिक्स करून कर्मचाऱ्यांना खाण्यास दिले. ज्यावेळी कर्मचाऱ्यांनी समोसे पाहिले असता त्यांना धक्का बसला.

पोलिसांकडून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
चिखली पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात आयपीसी (IPC) कलम 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमधील रहीम शेख, अजहर शेख आणि मजहर शेख हे कंपनीचे मालक आहेत. सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

आणखी वाचा : 

गुढीपाडव्यानिमित्त मुंबई-ठाण्यात वाहतूकीत बदल, नागरिकांना या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार

पानाच्या दुकानावर झालेल्या भांडणातून महाराष्ट्रात झाला खून, नेमकं घडलं काय?

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी जेल मधून बाहेर येणार ? पण ते प्रकरण काय आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय ? जाणून घ्या