- Home
- Maharashtra
- Jejuri Yatra : जेजुरी गडावर जायचंय? भाविकांसाठी आनंदाची बातमी! चंपाषष्ठी यात्रेसाठी पुणे विभागातून इतक्या जादा बसेस धावणार; संपूर्ण नियोजन लगेच बघा!
Jejuri Yatra : जेजुरी गडावर जायचंय? भाविकांसाठी आनंदाची बातमी! चंपाषष्ठी यात्रेसाठी पुणे विभागातून इतक्या जादा बसेस धावणार; संपूर्ण नियोजन लगेच बघा!
Jejuri Yatra : श्रीक्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठी यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता, एसटीच्या पुणे विभागाने जादा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बसफेऱ्या २६ नोव्हेंबरपासून पुणे विभागातील विविध आगारांतून सुटणार आहेत.

चंपाषष्ठी यात्रेसाठी पुणे विभागातून इतक्या जादा बसेस धावणार
पुणे: चंपाषष्ठीच्या दिवशी श्रीक्षेत्र जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. भाविकांना प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांच्या सोयीसाठी सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक उपलब्ध करून द्यावी, यासाठी एसटीच्या पुणे विभागाने जादा (एक्स्ट्रा) बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बसफेऱ्या २६ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून यात्रेच्या गर्दीचा विचार करून स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
३ दिवसांची चंपाषष्ठी यात्रा, खास बससेवांसह तयारी पूर्ण
२५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत श्रीक्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठीची मुख्य यात्रा पार पडणार आहे. यात्रेला हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याने एसटी प्रशासनाने पुणे विभागातून विविध मार्गांवरून जेजुरीकडे अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
या आगारांतून धावणार जादा बस फेऱ्या
२६ नोव्हेंबर रोजी खालील आगारांतून जेजुरीकडे अतिरिक्त बससेवा उपलब्ध असणार आहे.
शिवाजीनगर (वाकडेवाडी)
स्वारगेट
भोर
शिरूर
नारायणगाव
बारामती
या आगारांतून धावणार जादा बस फेऱ्या
राजगुरुनगर
तळेगाव
इंदापूर
दौंड
सासवड
पिंपरी-चिंचवड
मंचर
भाविकांची संख्या वाढल्यास हडपसर आणि कापूरव्होळ आगारांमधूनही विशेष बसफेऱ्या सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण नियोजनाबाबतची माहिती एसटी पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
भाविकांसाठी मोठा दिलासा
यात्रेच्या काळात गर्दी प्रचंड वाढते, त्यामुळे जादा बस सेवा उपलब्ध असणे ही भाविकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. प्रवास अधिक सुरळीत, वेगवान आणि ताणमुक्त होण्यासाठी एसटी विभागाने पूर्ण तयारी केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

