- Home
- Maharashtra
- जानेवारीत रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गावरील ११ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; ५ गाड्या रद्द
जानेवारीत रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गावरील ११ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; ५ गाड्या रद्द
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात रुळ दुरुस्तीमुळे ३ ते ९ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर-नांदेड मार्गावरील ११ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या बदलांमध्ये काही गाड्या अंशतः किंवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गावरील ११ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
छत्रपती संभाजीनगर: दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात रुळ दुरुस्ती आणि तांत्रिक देखभाल कामासाठी ३ ते ९ जानेवारीदरम्यान मोठा ‘लाइन ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या कामाचा सरळ परिणाम संभाजीनगर आणि नांदेड विभागातून धावणाऱ्या एकूण ११ गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार असून, प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.
अंशतः रद्द होणाऱ्या गाड्या
दौंड–निजामाबाद (11409)
2, 3, 4, 5, 7 आणि 8 जानेवारी रोजी अंशतः रद्द
गाडी फक्त छत्रपती संभाजीनगर ते मुदखेड इतकाच मार्ग धावेल
मुदखेड–निजामाबाद दरम्यान सेवा पूर्णत: बंद
निजामाबाद–पंढरपूर (11413)
3, 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी रोजी निजामाबाद–मुदखेड या भागात अंशतः रद्द
पूर्णपणे रद्द होणाऱ्या गाड्या
निजामाबाद–नांदेड (77645) : 3 ते 9 जानेवारी — पूर्णतः रद्द
नांदेड–निजामाबाद (77646) : 3 ते 9 जानेवारी — पूर्णतः रद्द
वेळापत्रकातील बदल व पुनर्नियोजन
विशाखापट्टणम–नांदेड (20821) – वेळेत बदल / पुनर्नियोजन
काचिगुडा–नरखेर (17641) – वेळेत बदल / नियमन लागू
उशिराने धावणाऱ्या गाड्या
मुंबई–लिंगमपल्ली (17057) : 3 जानेवारी — 50 मिनिटे उशीर
काचिगुडा–नगरसोल (17661) : 4 जानेवारी — आगमनात 2 तास उशीर
नगरसोल–काचिगुडा (17661) : 8 आणि 9 जानेवारी — सुटण्यात 1 तास उशीर
नांदेड–मेडचल (77606) : 3 ते 9 जानेवारी — तब्बल 3 तास विलंब
भगत की कोठी–काचिगुडा (17606) : 2 जानेवारी — नांदेड विभागात 2 तास उशीर
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्पष्ट सूचनादिली आहे की या काळातील प्रवासाचे नियोजन करण्याआधी सुधारित वेळापत्रक अवश्य तपासा.
लोणावळा–कल्याण विभागातही ‘पॉवर ब्लॉक’; मुंबई–पुणे प्रवाशांची डोकेदुखी वाढली
पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठीही मोठी बातमी. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत लोणावळा–कल्याण विभागात ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या काळात प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामे चालणार असून अनेक एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावतील. काही लोकल गाड्या नियोजित स्थळापूर्वीच थांबवण्यात येतील. मुंबई–पुणे प्रवासात मोठ्या प्रमाणावर विस्कळीतता अपेक्षित.
अशा परिस्थितीत प्रवाशांनी आपल्या प्रवासाची योजना करताना नवीन वेळापत्रक आणि बदल अनिवार्यपणे तपासावेत, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

