- Home
- Maharashtra
- Birth-Death Certificate Rule Update: आता जन्म किंवा मृत्यू दाखला मिळणार नाही उशिरा, सरकारचा कडक निर्णय लागू
Birth-Death Certificate Rule Update: आता जन्म किंवा मृत्यू दाखला मिळणार नाही उशिरा, सरकारचा कडक निर्णय लागू
Birth-Death Certificate Rule Update: बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे सरकारने नवीन नियम लागू केलेत. यानुसार, एक वर्षानंतर केलेल्या नोंदी अवैध ठरवून संबंधित प्रमाणपत्रे रद्द केली जाणारय, ज्यामुळे चुकीच्या मार्गाने मिळणारे लाभ थांबतील

जन्म किंवा मृत्यू दाखला वेळेत नोंदवा, अन्यथा तो मिळणं होईल अशक्य!
Birth-Death Certificate Rule Update: सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे आता उशिराने किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेले दाखले रद्द करण्यात येणार आहेत. बोगस दाखल्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासनाने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कशाप्रकारे होते जन्म-मृत्यू नोंदणी?
सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात ऑनलाइन केली जाते.
योग्य कागदपत्रे असल्यास दाखला एका दिवसात मिळतो, अन्यथा 21 दिवसांत देण्यात येतो.
मात्र, ज्या नोंदी एका वर्षानंतर केल्या जातात, त्या नोंदींबाबत सरकारने नवीन नियम लागू केला आहे.
काय आहे नवीन निर्णय?
जन्म किंवा मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.
एक वर्षानंतर केलेल्या नोंदी फक्त तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांच्या परवानगीने वैध मानल्या जातील.
तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्यांनी केलेल्या वर्षभरानंतरच्या नोंदी आता अवैध ठरणार आहेत.
अशा नोंदींवर आधारित दिलेली सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्यात येणार आहेत.
कोणती कार्यवाही होणार?
जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी सर्व शंकास्पद दाखल्यांची यादी तयार करून तहसीलदारांकडे सुपूर्त करतील.
तहसीलदार ही नोंदी तपासून, रद्द करण्याचा निर्णय घेतील.
रद्द झालेली प्रमाणपत्रे 7 दिवसांच्या आत संबंधितांनी तहसील कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.
न दिल्यास, पोलीस कारवाईद्वारे ती जप्त करण्यात येणार आहेत.
का घेण्यात आला निर्णय?
गेल्या काही महिन्यांत बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. काहीजण चुकीच्या मार्गाने दाखले मिळवून त्याचा अवैध वापर करत होते. उदाहरणार्थ, सरकारी योजनेसाठी अपात्र असूनही लाभ घेणे, संपत्ती मिळवणे किंवा शैक्षणिक लाभ मिळवणे.
आता काय करावं?
जन्म किंवा मृत्यूची नोंद जास्तीत जास्त 12 महिन्यांच्या आत करून घ्या.
प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची एक प्रत सुरक्षित ठेवा.
जर जुना दाखला एक वर्षानंतर घेतला असेल आणि शंका असेल, तर तहसील कार्यालयाशी संपर्क करा.
बोगस दाखले टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.
जन्म किंवा मृत्यू दाखला वेळेत नोंदवा
सरकारने घेतलेला हा निर्णय जन्म-मृत्यू नोंदींच्या पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक ठरतोय.
यामुळे खोट्या दस्तावेजांवर मिळणारे लाभ थांबणार असून, योग्य व्यक्तीला योग्य हक्क मिळणार आहे.
तुमच्याकडे असा कोणताही दाखला असेल तर वेळेत पडताळणी करून घ्या, कारण आता "दाखला" सहज मिळणं शक्य होणार नाही!

