सार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगाव येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी आंदोलन केले असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे. त्यांनी जनतेपर्यंत पोहचून सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यात्रेला नारायणगाव मध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी आंदोलकांच्या मदतीने गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आशा बुचके यांची तब्येत खालावली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अजित पवार हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांच्या दौऱ्याच्या फ्लेक्सवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो नाहीत, ते स्थानिक कार्यकर्त्यांचे ऐकत नाही असे यावेळी आशा बुचके यांनी म्हटले आहे. त्यांची तब्येत खालावल्यामुळे खाजगी रुग्णालयात आशा बुचके यांच्यावर उपचार चालू आहेत. अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असे त्यांनी म्हटले होते. 

आशा बुचके यावेळी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या आणि यावेळी अतुल बेनके यांच्यावर त्यांचा रोख होता असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होत. त्यांच्या या आंदोलनावर रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. चाकणकर यांनी बोलताना म्हटले की, आशा बुचके यांनी दादांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, दादांनी त्यांचे बोलणे ऐकून घेऊन त्यावर कृती केली असती. 
आणखी वाचा - 
मराठ्यांनी आरक्षण मागावे का?, संभाजी भिडेंचा सवाल; बांगलादेश हिंसाचाराला विरोध