श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सांगली: बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्टला कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रियाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी दिली आहे. तसंच मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. तसंच मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलंय, असंही भिडे म्हणालेत. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मराठ्यांनी आरक्षण मागावे का?: संभाजी भिडे

मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.

'कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार'

देशात बलात्कार प्रकार हा किळसवाणा झाला आहे, हे अत्याचार थांबायला हवेत. कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबवावा: संभाजी भिडे

पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदूस्थानकडे आश्रयाला आल्या, दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. पंतप्रधान भारतात आल्यावर बांगलादेश मध्ये प्रतिक्रिया उमटल्या . हिंदूंवर अत्याचार होतोय, बांगलादेशमध्ये सुरू असलेला अत्याचार तात्काळ थांबला पाहिजे. हिंदूस्थानमध्ये याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही. बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्टला कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतरन नको ,त्याना बांगलादेशामध्येच सुरक्षा मिळायली हवी. सगळ्या हिंदू राजकारण लोकांनी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवे, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणालेत.

आणखी वाचा :