पुणे जिल्ह्याच्या घाट भागासाठी रेड अलर्ट जारी, अतिवृष्टीची शक्यता. कोकण, नाशिक, सातारा जिल्ह्यांमध्येही अलर्ट जारी, खबरदारीचा इशारा.

Pune: पुणे जिल्ह्याच्या घाट भागासाठी भारताच्या हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये अत्यंत तीव्र आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे त्राण, अग्निशमन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांना सतर्क करण्यात आले आहे. एका बाजूला घाट भागांत पावसाचे प्रमाण वाढत असले तरी पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तरीही घट्ट ढगाळ आकाशामुळे शहरात प्रवास, वाहतूक व रस्त्यावर पाणी साचणे यांसारख्या गोष्टींसाठी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात येलो अलर्ट 

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट मथ्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता धरून सावधान राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट

सातारा आणि नाशिकच्या घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. येथे अतिवृष्टीचा पावसाची शक्यता असून, संभाव्य जलप्रवाह, डोंगर खचणे आणि रस्ता बंद होण्याची परिस्थिती लक्षात घेऊन गावात राहणाऱ्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ताम्हिणीमध्ये चांगला पाऊस 

घाट भागांत विशेषतः ताम्हिणी घाटात २४ तासांत २८० मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद आहे. महाबळेश्वरमध्ये २०२ मिमी, कोयना १८८ मिमी आणि लोणावळा १५१ मिमी इतकी पाऊस नोंदवली गेली. या पावसामुळे खडकवासला व ताम्हिणी परिसरात धरण साठा जवळपास पूर्ण भरला असून नदी किनारी भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या परिस्थितीत प्रशासनाने नदीकाठच्या रस्त्यांवर वाहतूक थांबवली, पाणी साचलेले भाग बंद केले आणि लोकांना वेळोवेळी सतर्कतेची माहिती देणारे अलर्ट सिस्टीम्स चालू केले आहेत. पुढील दिवसात पावसाचं जोर कमी न झाल्यास यंत्रणा अधिक सतर्क होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.