राज्यात अतिवृष्टीचा देण्यात आला इशारा, गडचिरोलीचा विदर्भाशी असणारा संपर्क तुटला

| Published : Jul 21 2024, 01:51 PM IST

maharashtra rain
राज्यात अतिवृष्टीचा देण्यात आला इशारा, गडचिरोलीचा विदर्भाशी असणारा संपर्क तुटला
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वत्र पाऊस पडत असून सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश पोलिस प्रमुखांना देण्यात आले आहेत. 

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाल्याचे आपण पाहिले आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत सर्व ठिकाणी तुफान पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे.सर्व जिल्हांमधील पोलीस प्रमुखांना फोन करून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कधीही कोणत्याही वेळी सतर्कतेची घटना घडू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यावी असे त्यांनी सुचवले आहे. 

चंद्रपुरात नदीला आला पूर - 
चंद्रपुरातील एका नदीला पूर आला असून त्यामध्ये २५ नागरिक अडवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना पोलिसांच्या टीमने २५ जणांना रेक्यु करण्यात आले आहे. ते सर्व जण शेतात गेले होते आणि नंतर त्यांना पोलिसांच्या टीमने रेस्क्यू केले आहे. त्यानंतर एका ठिकाणी रिसॉर्टमध्ये काही पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न चालू आहेत. 

गडचिरोलीचा तुटला संपर्क - 
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांचा बाहेरच्या जिल्ह्यांशी असलेल्या संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यांशी येथील लोकांचा संपर्क तुटला आहे. अनेक शेतांमध्ये आतमधे पाणी शिरले असून त्यामुळे महापुरात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सरकारच्या वतीने लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावा असे सांगण्यात येत आहे. 

पंचगंगा नदीच्या पुलावर पुराचे पाणी आले असून यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८० बंधारे पाणीखाली गेले असून कर्नाटकालाही जोडणारे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सातारा आणि कोल्हापूर येथे प्रचंड प्रमाणावर पाऊस होत असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असे सांगण्यात येत आहे. 
आणखी वाचा - 
चंद्रपुरात पावसाचा कहर, शेकडो घरं पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत
राज्यात महाविकास आघाडीच जिंकणार, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास