राज्यात महाविकास आघाडीच जिंकणार, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

| Published : Jul 21 2024, 11:29 AM IST

Sanjay Raut

सार

गुरुपौर्णिमेचे महत्व जे आहे ते आम्हाला हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

 

आम्हाला शहाणपण, स्वाभिमान, निष्ठा, ईमान याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले. नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची घडवणूक जपणूक हे शिवसेनाप्रमुखांनी केल्याचे राऊत म्हणाले. म्हणून आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते हिंदुत्वाचे ते गुरु होते असंही राऊत म्हणाले. गृहमंत्र्यांनी ठाण मांडू द्या, पंतप्रधान मोदींनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा किंवा पुतीनला बोलवा या राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

'तर तो आनंद दिघे यांचा अपमान'

आम्ही सन्माननीय आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखत होतो. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानत असतील, त्यांचं खोटं चित्र उभा करत असतील तर तो सन्माननीय आनंदे यांचा अपमान आहे असे राऊत म्हणाले. आम्ही जर सिनेमे काढले तर त्यांना तोंड झाकून फिरावे लागेल असा टोला देखील शिवसेना शिंदे गटाला राऊतांनी लगावला. कसला चित्रपट, आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवल्या जात असल्याचे राऊत म्हणाले.

आपल्या खोटेपणावर पांघरुन घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट येत आहेत. पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो, पण आता विधानसभेच्या निवडणुका असल्याचे राऊत म्हणाले. पण जे बाहेर गेले माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी बाळासाहेबांचा गुरु म्हणून फोटो लावू नये असे राऊत म्हणाले.

अतिरेक्यांवर दबाव आणला पाहिजे, अमित शाहांवर राऊतांची टीका

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील राऊतांनी टीका केली. ते देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होतात, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत, मणिपूर अजून पेटलेले आहे, उत्तर प्रदेश मध्ये कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे असं राऊत म्हणाले. गृहमंत्री पदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणला पाहिजे असे राऊत म्हणाले.

'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार'

गृहमंत्र्यांनी ठाण मांडू द्या, पंतप्रधान मोदींनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा किंवा पुतीनला बोलवा या राज्यात उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखांचा शिवसेना या तिघांच्या महाविकास आघाडीच सरकार येईल. याविषयी आमच्या मनात शंका नाही असंही राऊत म्हणाले.

आणखी वाचा :

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी BJP कडून खास रणनिती तयार