सार
छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील वाळुज भागात प्रेमप्रकरणातून ऑनर कलिंगची घटना घडली आहे. एका १७ वर्षीय मुलीला तिच्या चुलत भावाने डोंगरावरून ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश तानाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव) असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे आणि एका तरुणाचे प्रेमप्रकरण सुरू होते. तिच्या घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते. यावरून तिचे घरच्यांशी खटके उडत होते. त्यामुळे कुटुंबीयांनी दोघांची समजूत काढली. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगर जवळील वळदगाव येथे काकांकडे पाठवण्यात आले.
सोमवारी दुपारी ऋषिकेश बहिणीला गोड बोलून खवड्या डोंगरावर घेऊन आला. तिथं तिच्याशी बोलता-बोलता त्यानं तिला २०० फूट डोंगरावरून खाली ढकलून दिलं. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.स्थानिकांनी घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत मुलीचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी वाचा-
१९ वर्षीय कंटेंट क्रिएटरने लाइव्ह स्ट्रीममध्ये आत्महत्या केली