सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 30 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. पुढील वर्षी होणाऱ्या शिवजयंतीच्या आधी सिंधुदुर्ग येथे भव्य शिवपुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

२. वाऱ्यानं पुतळा उडाला म्हणता तर वाऱ्यानं मिंधेची दाढी का उडाली नाही, अशी मिश्किल टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

३. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातून ४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. 

४. महाविकास आघाडीचे नेते आज बैठक घेणार असून यामध्ये जागावाटपाच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल हे सांगण्यात आलं आहे. 

५. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यामध्ये पावसाळी मदतीच्या संदर्भातील आढावा घेतला जाणार आहे.