शनिवार, 28 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

| Published : Sep 28 2024, 08:16 AM IST / Updated: Sep 28 2024, 09:48 AM IST

THUMBNIL

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 28 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाने डंका वाजवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने १० जागांवर विजय मिळवला आहे. 

२. सिनेटसारखा विजय महाविकास आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत राहील असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे. 

३. दिवटा आमदार म्हणून सुनील टिंगरे यांचा शरद पवार यांनी उल्लेख केला आहे. निवडणुकीत जनता तुला धडा शिकविलं असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. 

४. शरद पवार मला कायम आदरणीय असून त्यांना माझे कान पकडायचा अधिकार असल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे. 

५. राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर गेले असून दुपारी ते पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

६. पश्चिम रेल्वेवर १० तासांचा बंद केला जाणार असून याकाळात प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा असं सांगण्यात आलं आहे. 

७. १ ऑक्टोबरला अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली असून या दिवशी ते चक्क्का जाम आंदोलन करणार आहेत. 

८. मुंबईत आजही पाऊसाचा अंदाज असून ठाणे आणि पालघरमध्ये ३ दिवस पाऊस पडणार आहे.