सार
नागपूर : शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला देणाऱ्या आईवडीलांची २१ वर्षीय तरुणाने हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. पाच दिवस पलंगाखाली ठेवलेले आई-वडिलांचे मृतदेह कुजत गेल्याने दुर्गंधी आजूबाजूच्या घरांपर्यंत पोहोचली, त्यामुळे हे क्रूर कृत्य समोर आले. ही घटना कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा येथे गुरुवारी सकाळी सहा दिवसांनी उघडकीस आली. या प्रकरणी अभियांत्रिकीचा विद्यार्थी उत्कर्ष डाखोळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
लीलाधर डाखोळे(५०) आणि त्यांची पत्नी अरुणा डाखोळे(४२) अशी मृतांची नावे आहेत. लीलाधर हे कोराडी येथील थर्मल पॉवर स्टेशनचे कर्मचारी होते तर त्यांच्या पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या. कुटुंबात मुलगा उत्कर्ष शिवाय एक मुलगी आहे.
नापास होत असल्याने वाद
अभ्यासात मागे राहिल्यामुळे उत्कर्ष तीन वर्षे अभियांत्रिकीच्या परीक्षेत काही विषयात नापास होत राहिला. यानंतर आई-वडिलांनी त्याला अभ्यासक्रम बदलावा किंवा कुटुंबाची शेती सांभाळावी, असा सतत आग्रह धरला. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्कर्ष परीक्षेत नापास झाल्याने अखेर २५ डिसेंबर रोजी वडिलांनी त्याला चापट मारली. २६ डिसेंबर रोजी वडील अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले होते आणि बहीण कॉलेजला गेली होती, तेव्हा उत्कर्षने आई अरुणाची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तरुण बराच वेळ मृतदेहाकडे पाहत राहिला आणि वडील घरी आल्यानंतर त्यांचीही चाकून वार करून हत्या केली. त्यानंतर उत्कर्षने आपल्या बहिणीसोबत नातेवाईकांच्या घरी जाण्यापूर्वी, त्याचे आई-वडील बंगळुरू येथे एका ध्यानधारणेच्या कार्यक्रमाला गेले होते अशी कथा रचली. १ जानेवारी रोजी घराच्या आतून दुर्गंधी जवळच्या घरांमध्ये पसरली, त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता त्यांना आतमध्ये मृतदेह दिसले. त्यानंतर ही घटना समोर आली.
घर बाहेरून बंद असल्याने पोलिसांना आला संशय
पोलीसांनी दोघांचे कुजलेले मृतदेह नागपूरमधील काम्पटी रोडवरील त्यांच्या राहत्या घरातून बाहेर काढले. तपासादरम्यान, लीलाधरच्या यांच्या फोनमध्ये एक सुसाइड नोट सापडली, परंतु घर आणि खोल्या बाहेरून बंद होत्या, त्यामुळे पोलिसांना या घटनेचा संशय आला. हत्येनंतर उत्कर्ष वडिलांचा फोन घेऊन निघून गेला होता.
लोकेशन बंद करून उत्कर्षने फोन पोलिसांना घरी सापडल्याचे सांगून नंतर फोन दिला.पोलिसांना संशय आला आणि त्याची चौकशी केली, ज्यामुळे निर्घृण हत्येचा खुलासा झाला. अभ्यासात मागे राहिल्याने आई-वडील त्याला अभियांत्रिकी सोडून इतर अभ्यासक्रम करून शेती करण्यास सांगत होते, त्यामुळे रागाच्या भरात त्याने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.
आणखी वाचा-