सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 1 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यांनी दारू प्यायल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

२. मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके समर्थक ससून रुग्णालयाच्या गेटवर समोरासमोर आले, यावेळी दोनही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. 

३. महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळणार असून मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

४. छोटे नेते मंत्रिपदासाठी बोलतात असा आरोप आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे. त्यांनी शरद पवार यांना औरंग्या म्हणून संबोधले होते. 

५. आकाश अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात २० मिनिट संवाद झाला असून भेटीमागचे कारण स्पष्ट झालं नाही.