कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली असून, धरणे लवकर भरल्याने दुष्काळाची शक्यता कमी झाली आहे. योग्य नियोजन केल्यास धरणातील पाणी वर्षभर शेती आणि पिण्यासाठी पुरेल.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणांमध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी उपलब्ध झालं आहे. उन्हाळी महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणी समस्येतून या भागातील लोकांची चिंता मिटली आहे. उन्हाळा आला की कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो पण यावर्षी धरणं लवकर भरल्यामुळं ही शक्यता कमी झाली आहे.

जिल्ह्यात छोटीमोठी १७ धरणे 

जिल्ह्यात एकूण छोटीमोठी धरून १७ धरणे आहेत. सर्वाधिक क्षमतेचे वारणा धरण असून त्याची क्षमता ३४ टीएमसी इतकी आहे. हे धरण सांगली जिल्ह्यात येत असले तरी त्याचा फायदा हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना होत असतो. त्यानंतर २५ टीएमसी साईजचे दूधगंगा धरण असून राधानगरी धरण चांगलं मोठं आहे.

धरण ओव्हरफ्लो होणार 

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळं ते आता ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरु झाल्यामुळं एकसारखा पाऊस पडत आहे. जुलैत शेवटच्या आठवड्यापर्यंत शक्यतो जिल्ह्यातील सर्वच धरण पूर्ण क्षमतेने भरलेली होती. वर्षभर योग्य पद्धतीने नियोजन केल्यास धरणातील पाणी वर्षभर शेती आणि पिण्यासाठी पुरु शकते.

अजून निम्मा पावसाळा बाकी 

अजून निम्मा पावसाळा बाकी असून पुढं पाऊस किती पडतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. या कालावधीत पाऊस जोरात असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील ३० वर्ष राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे भविष्य त्यावर असत. यंदा अतिवृष्टीसारखा पाऊस न पडल्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं दिसून आलं आहे.