Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दाखवा हा नैवेद्य, पैशांसंबंधित समस्या होतील दूर

| Published : Jul 01 2024, 08:11 AM IST / Updated: Jul 01 2024, 08:15 AM IST

lord vishnu
Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दाखवा हा नैवेद्य, पैशांसंबंधित समस्या होतील दूर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीनिमित्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवल्याशिवाय योगिनी एकादशीच्या पूर्ण पूजेचे फळ मिळत नाही.

Yogini Ekadashi 2024 : संपूर्ण वर्षभरात एकूण 24 एकादशी तिथी असतात. सर्व एकादशींना विशेष महत्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीनिमित्त योगिनी एकादशीचे व्रत केले जाते. यंदा योगिनी एकादशी 2 जुलैला साजरी केली जाणार आहे. या खास दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी याची विशेष पूजा-प्रार्थना करण्याचे सांगितले जाते. याशिवाय सर्व पापांमधून मुक्तता मिळण्यासाठी योगिनी एकादशी दिवशी बहुतांशजण उपवासही ठेवतात. धार्मिक मान्यतेनुसार, योगिनी एकादशीला उपवास ठेवल्यास आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर होतात.

योगिनी एकादशीसाठी खास नैवेद्य

  • भगवान विष्णूंना पंचामृत प्रिय आहे. यामुळे एकादशीच्या पूजेच्या अखेरीस प्रभूंना पंचामृतचा नैवेद्य जरुर दाखवावा. असे केल्याने देवी लक्ष्मी आणि श्री हरि प्रसन्न होतात. याशिवाय धन लाभाचा योगही होतो. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासत नाही.
  • विष्णूंना खीरचा देखील नैवेद्य दाखवू शकता. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या आरोग्यातही बदल झालेले दिसतील.
  • भगवान विष्णूंना केळ प्रिय आहे. प्रभूंना केळ्याचा नैवेद्य दाखवल्यास धनासंबंधित समस्या दूर होतात. याशिवाय कुंडलीतील गुरु दोषही दूर होतो.
  • योगिनी एकादशीनिमित्त विष्णूंना दूध आणि दही दाखवा. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात शुभ फळ मिळते.
  • विष्णूंना मोतीचूर लाडू अर्पण करु शकता. यामुळे एकादशीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते.

नैवेद्य दाखवताना म्हणा हा मंत्र

त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये।

गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।

अर्थ : वरील मंत्राचा असा अर्थ होतो की, देवा माझ्याकडे जे काही आहे, ते फक्त तुम्हीच दिले आहे. जे स्वतःला तुमच्यासाठी समर्पित करत आहेत. कृपया माझा हा प्रसाद स्विकारा.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Chaturmas 2024 : यंदा कधीपासून सुरु होणार चातुर्मास? 4 महिने शुभ कार्य करणे असणार वर्ज्य

प्रेमानंद महाराजांनी सांगितले घरात मुलगी असण्याचे महत्त्व, जाणून घ्या