सार
Chaturmas 2024 : हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून चातुर्मासला सुरुवात होते. या काळात कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत. यंदा चातुर्मास कधीपासून सुरु होणार याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Chaturmas 2024 Date : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी शुभ मुहूर्त पाहिला जातो. अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी चार महिने असे असतात ज्यामध्ये कोणतीही शुभ कार्ये केली जात नाही. याच चार महिन्यांना चातुर्मास असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रेत जातात आणि कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउठनी एकादशीला जागे होतात. जाणून घेऊया यंदा चातुर्मास कधीपासून सुरु होणार, महत्त्व आणि कोणती कामे करणे वर्ज्य असते याबद्दल सविस्तर...
कधीपासून सुरु होणार चातुर्मास?
हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्यापासून ते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देवउठनी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. यंदा चातुर्मास 17 जुलै पासून सुरु होणार आहे. याशिवाय देवउठनी एकादशी 12 नोव्हेंबरपर्यंत आहे.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीची तिथी 16 जुलैला संध्याकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी सुरु होणार आहे, जी 17 जुलैला रात्री 09 वाजून 02 मिनिटांनी संपणार आहे. अशातच 17 जुलैला देवशयनी एकादशी असणार आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी येत्या 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 06 वाजून 46 मिनिटांपासून ते 12 नोव्हेंबर संध्याकाळी 04 वाजून 04 मिनिटांनी संपणार आहे. यामुळे 12 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी असणार आहे. याशिवाय 13 नोव्हेंबरपासून लग्नसोहळा आणि अन्य शुभ कार्यांना सुरुवात होईल.
शुभ कार्ये करण्यास वर्ज्य
चातुर्मासावेळी भगवान विष्णु निद्रा अवस्थेत जातात. अशातच चातुर्मासवेळी केलेल्या शुभ कार्यांमध्ये भगवान विष्णुंचे आशीर्वाद मिळत नाही. यामुळेच चातुर्मासवेळी लग्न, मुंडण अशी शुभ कार्ये केली जात नाही. दरम्यान, चातुर्मासात भगवान विष्णु नव्हे तर शंकर, देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.
कोणती कामे करू नयेत
चातुर्मासदरम्यान, शुभ कार्यांसह काही कामे करणे टाळले जाते. या वेळी लग्नसोहळा, मुंडण, नवे वाहन खरेदी, नवी प्रॉपर्टी खरेदी, भूमि पूजन अथवा घराचे बांधकाम अशी कार्ये करता येत नाहीत.
(DISCLAIMER लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
Nirjala Ekadashi निमित्त भगवान विष्णूंच्या या 10 मंत्रांचा करा जाप, होतील सर्व दु:ख दूर