वृंदावनातले प्रेमानंद महाराज यांना एका भक्ताने त्याच्या दोन मुलींबद्दल विचारले. भक्ताने म्हटले की, दोन मुली असून लोक म्हणतात एक मुलगा असावा. यावर काय सांगाल...
प्रेमानंद महाराजांनी म्हटले की, तुमच्याकडे खूप पैसा, घर अथवा व्यवसाय असो पण घरात आई-बहीण अथवा मुलगी नसल्यास तेथे आनंद नसतो.
लहान घर असले तरीही त्यामध्ये आई, बहीण अथवा मुलगी असल्यास ते स्वर्गासमान वाटते. यामुळेच महिलांना गृहलक्ष्मी म्हटले जाते.
प्रेमानंद महाराज म्हणतात की, सध्या मुलगा अथवा मुलीमध्ये अंतर करु नये. आजकालचे मुलं वृद्ध आई-वडिलांना घरातून काढतात. पण याच स्थितीत मुलगी नेहमीच पालकांना आधार देते.
प्रेमानंद महाराज म्हणतात आजकालच्या बहुतांश प्रकरणात मुलीच आपल्या आई-वडिलांना आयुष्यभर सांभाळण्याचा विचार करतात.