2024 मध्ये या फूड्सवर घातलीय बंदी, कारण काय? वाचा

| Published : Dec 09 2024, 02:30 PM IST

dishes and food product ban in 2024 year ender

सार

Year Ender 2024 : भारत सरकार आणि FSSAI कडून 2024 मध्ये काही फूड्स आणि प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तुमच्या पसंतीची डिश तर नाही ना? याबद्दलच जाणून घेऊया...

Year Ender 2024 Foods to banned :  वर्ष 2024 मध्ये भारत सरकार आणि खाद्य सुरक्षा विभागाकडून ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेता काही फूड्स आणि फूड्स प्रोडक्ट्सवर बंदी घातली. यामागील कारण काय आणि कोणत्या फूड्सचा समावेश आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

हाय ट्रान्स फॅट स्नॅक्स

पदार्थांमध्ये अत्याधिक ट्रान्स फॅट्स असल्याने हृदयासंबंधित समस्या आणि लठ्ठपणाचा धोका वाढला जातो. यामुळे काही लोकल ब्रँड्सचे चिप्स आणि तळलेल्या स्नॅक्सवर बंदी घालण्यात आली.

सिंथेटिक रंगांपासून तयार करण्यात आलेली मिठाई

सिंथेटिक रंगांचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे कॅन्सर अथवा अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवली जाऊ शकते. बनावट रंगांपासून तयार केलेली मिठाई किंवा केक तयार करणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

प्लास्टिकमध्ये बंद असणारे पदार्थ

पर्यावरणाला प्लास्टिकच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक खास अभियान चालवण्यात आले होते. याअंतर्गतच प्लास्टिकच्या बॅगमध्ये बंद असणाऱ्या पदार्थांच्या कंपन्यांना आपल्या पॅकेजिंच्या स्टाइलमध्ये बदल करण्यात सांगण्यात आले.

अत्याधिक कॅफेनयुक्त ड्रिंक्स

अत्याधिक कॅफेन असणारे ड्रिंक्सवरही यंदाच्या वर्षात बंदी घालण्यात आली. काही लोकप्रिय ब्रँड्सला ही मार्केटमध्ये बंदी घातली. जेणेकरुन नागरिकांचे आरोग्य प्रभावित होणार नाही.

हाय सोडियम जंक फूड्स

अत्याधिक खारट पदार्थांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब किंवा किडनीसंदर्भातील समस्या उद्भवल्या जातात. यामध्ये इन्स्टंट नूडल्स किंवा रेडी-टू-इट प्रोडक्ट्सचा समावेश आहे.

एक्सपायरी डेट असणारे समुद्रातील पदार्थ

फूड पॉइजनिंगच्या आणि अन्य कारणास्तव शिळे आणि खराब झालेले समुद्रातील पदार्थ विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली. स्थानिक मार्केटमध्ये तपास अभियान सुरू करण्यात आले. यामुळे खराब झालेले समुद्रातील पदार्थ हटवण्यात आले.

बनावट हर्बल आणि ऑर्गेनिक प्रोडक्ट्स

चुकीच्या लेबलिंग आणि सिंथेटिक केमिकल्सचा वापर केल्याने काही ऑर्गेनिक ब्रँड्सवर कार्यवाही करण्यात आली. ग्राहकांना प्रोडक्ट्समधील सत्यता पटवण्याचा सल्ला दिला गेला.

आणखी वाचा : 

थंडीत आवर्जुन खा या 5 भाज्या, थकवा होईल दूर

हाडांच्या बळकटीसाठी ते केसांसाठी फायदेशीर आहे गूळ, फायदे

Read more Articles on