Year Ender 2023 : वर्ल्ड कप ते जस्ट लुकिंग लाइक अ WOW,हे ट्रेण्ड सोशल मीडियात सर्वाधिक व्हायरल

| Published : Dec 23 2023, 09:22 AM IST / Updated: Dec 23 2023, 09:39 AM IST

Social Media Trend

सार

Year Ender 2023 : वर्ष 2023 संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र यंदाच्या वर्षातील काही ट्रेण्डमुळे कॉन्टेंट क्रिएटर्सला प्रसिद्धी मिळाली.

Year Ender 2023 : यंदाचे वर्ष 2023 मध्ये इंटरनेटवर अशा काही गोष्टी खूप व्हायरल झाल्या की त्यावरून गाणी, मीम्सही आले. एखाद्या गोष्टीमुळे हसू आले तर दुसऱ्या गोष्टीमुळे डोळ्यात पाणी आले. आपण यंदाच्या वर्षात कोणत्या गोष्टी ट्रेण्डमध्ये राहिल्या याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

नारायण मूर्ती यांचे 70 तास काम करण्याचे विधान
इंन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची एक मुलाखत जोरदार चर्चेत राहिली. या मुलाखतीत मूर्ती यांनी भारतीयांना आठवड्यात 70 तास काम करावे असे म्हटले होते. त्यांचे हे विधान सोशल मीडियात खूप व्हायरल झाले. पण या विधानावरून काहींनी टीका देखील केली.

YouTube video player

दिल्ली मेट्रो व्हायरल व्हिडीओ
यंदाच्या वर्षात दिल्ली मेट्रोमध्ये खूप व्हिडीओ तयार करण्यात आले. मेट्रोमध्ये महिला हेअर स्ट्रेटनिंग करतेय तर दुसरा एखादा डान्स करताना दिसून येत आहे. अशाप्रकारचे वेगवेगळ्या मुद्द्यांवरील दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाले.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक
यंदाच्या वर्षात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे आयोजन भारतात करण्यात आले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला हार पत्करावी लागली होती. तर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.

यादरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा क्रिकेटच्या सामन्यातील पराभवानंतरचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये रोहित शर्माच्या डोळ्यातून अश्रू वाहताना क्रिकेटप्रेमींनी पाहिले. रोहितच्या या इमोशनल व्हिडीओवर खूप युजर्सने भारताच्या संघाला पाठिंबा दिला.

जस्ट लुकिंग लाइक अ WOW
सोशल मीडियात फॅशन डिझाइनर आणि दिल्लीतील एका कपड्यांच्या बुटीकची मालकीण जॅस्मीन कौर हीचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. जस्ट लुकिंग लाइक अ Wow बोलून कौर ही रातोरात इंटरनेटवर स्टार झाली. या व्हिडीओवर अभिनेत्री दीपिका पादुकोण ते निक जोनस यांनी रील्सही बनवल्या.

View post on Instagram
 

 

ऑरीची क्रेझ

View post on Instagram
 


बी टाउनमधील सर्व सेलिब्रेटींसोबत फोटो काढणाऱ्या ओरहान अवात्रामणि (Orhan Awatramani) उर्फ ऑरी (Orry) याची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली. ऑरीला अभिनेत्री जान्हवी कपूर, न्यासा देवगण, सारा अली खानसारख्या स्टार किड्ससोबत नेहमीच पार्ट्यांमध्ये दिसून आला. आपल्या आयकॉनिक पोझच्या कारणास्तव ऑरी सोशल मीडियामध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक आहे.

आणखी वाचा: 

ख्रिसमससाठी घरच्या घरी बनवा रसमलाई केक

12/31/23 : यंदाच्या वर्षातील शेवटचा दिवस तुमच्यासाठी या कारणास्तव आहे खास

ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढलेय? करा या सोप्या Exercise