Asus ROG Phone 8 सीरिज लवकर होणार लाँच, हे धमाकेदार फिचर्स मिळण्याची शक्यता

| Published : Jan 03 2024, 04:25 PM IST / Updated: Jan 03 2024, 04:26 PM IST

asus

सार

टेक कंपनी Asus लवकरच दोन धमाकेदार फिचर्ससोबत स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. अद्याप Asus ROG Phone 8 सीरिज नक्की कोणत्या तारखेला लाँच होणार याबद्दल तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार फोनचे फिचर्स समोर आले आहेत.

Asus ROG Phone 8 Series : टेक कंपनी Asus लवकरच नेक्स्ट जनरेशन गेमिंग स्मार्टफोन Asus ROG Phone 8 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ROG फोन 8 सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन- Asus ROG Phone 8, Asus ROG Phone 8 Pro लाँच करू शकते. दोन्ही स्मार्टफोन लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8th जनरेशनच्या 3 प्रोसेस आणि क्वॉलकॉम अ‍ॅड्रिनो GPU सोबत येऊ शकतात.

कंपनीने अद्याप फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोनसाठी कोणते स्पेसिफिकेशन असू शकतात याबद्दल सांगण्यात आले आहे. या रिपोर्ट्सनुसार स्मार्टफोनसाठी कोणते फिचर्स मिळू शकतात याबद्दल जाणून घेऊया अधिक....

Asus ROG Phone 8 सीरिजसाठी हे फिचर्स मिळण्याची शक्यता...

डिस्प्ले: कंपनीकडून दोन्ही स्मार्टफोनसाठी 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.78 इंचाचा FHD+ अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. डिस्प्लेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2चे प्रोटेक्शन मिळू शकते.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी ROG फोन 8 प्रो मध्ये 50MP + 13 MP + 32 MPचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय ROG फोन 8 च्या कॅमेऱ्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी दोन्ही फोनमध्ये क्विक चार्ज 5.O सपोर्टसह 5500mAh ची बॅटरी मिळू शकते.

ऑपरेटिंग सिस्टिम: दोन्ही फोनमध्ये अ‍ॅन्ड्रॉइड 14 आधारित ROG UI ऑपरेटिंग सिस्टिम मिळण्याची शक्यता आहे.

कनेक्टिव्हिटी: फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही फोनध्ये 5G, 4G, 3G, NFC, ब्लूटूथ 5.4, 3.5mm हेडफोन जॅक, Wifi 6 आणि चार्जिंगसाठी USB टाइप-C सपोर्ट दिला जाऊ शकतो.

दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो ROG फोन 8 प्रो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ROG फोन 8 हा 126GB रॅम + 256GB स्टोरेजसोबत सिंगल व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो. याशिवाय प्रो मॉडेलमध्ये 16GB रॅम + 512GB स्टोरेज आणि 24GB रॅम + 1TB स्टोरेजच्या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो.

 

आणखी वाचा: 

तुमच्या आधार कार्डवर किती SIM Card रजिस्टर आहेत हे कसे ओळखाल? वापरा या सोप्या ट्रिक

एक चूक आणि 71 लाख WhatsApp अकाउंट बंद? जाणून घ्या काय आहे प्रकरण

तुमच्या मोबाइल क्रमांकामध्ये आहेत हे 2 अंक? खर्च होतील अधिक पैसे