MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • World Toilet Day 2023 : जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

World Toilet Day 2023 : जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

World Toilet Day 2023: जगभरात 19 नोव्हेंबरला ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे शौचालयाची योग्यपद्धतीने स्वच्छता करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे.   

2 Min read
Harshada Shirsekar
Published : Nov 18 2023, 08:53 PM IST| Updated : Nov 18 2023, 09:02 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शौचालय स्वच्छ करणे का गरजेचं?
Image Credit : Getty

शौचालय स्वच्छ करणे का गरजेचं?

World Toilet Day 2023: शौचालयाचे व त्याच्या स्वच्छतेचे महत्त्व लोकांना समजावे, यासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक शौचालय दिन’ (World Toilet Day 2023) साजरा केला जातो.  

आजही कित्‍येक लोक सोयीसुविधांच्या अभावामुळे उघड्यावर शौचास बसतात. शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. कारण उघड्यावर शौचास बसल्याने गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. हेच धोके टाळण्यासाठी ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जातो.

25
जागतिक शौचालय दिनाचा इतिहास (World Toilet Day 2023 History)
Image Credit : Getty

जागतिक शौचालय दिनाचा इतिहास (World Toilet Day 2023 History)

वर्ष 2001मध्ये सिंगापूरमधील जॅक सिम यांनी जागतिक शौचालय संघटनेची (World Toilet Organization) स्थापना केली. यानंतर वर्ष 2013मध्ये 'जागतिक शौचालय दिन' साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही मंजूर करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र संघाकडूनही अधिकृतरित्या संयुक्त राष्ट्र जागतिक शौचालय दिवसाची घोषण्यात करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जात आहे. ‘वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन’ ही संस्था जगभरात स्वच्छता व शौचालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे.

35
जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो? (Why Do We Celebrate World Toilet Day)
Image Credit : Getty

जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो? (Why Do We Celebrate World Toilet Day)

  • जागतिक शौचालय दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखणे व शौचालयाशी संबंधित मानवी हक्क प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हा आहे.
  • जगभरात स्वच्छता व निरोगी आरोग्यबद्दलची माहिती पोहोचवणे
  • उघड्यावर शौचास बसल्याने होणारे संसर्गजन्य आजार व अस्वच्छता पसरण्यापासून रोखणे, याबाबत जागतिक स्तरावर जागरुकता पसरवण्यासाठी ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जातो.
45
या गोष्टींचीही घ्या काळजी
Image Credit : Getty

या गोष्टींचीही घ्या काळजी

टॉयलेट सीट अशी करा स्वच्छ (How To Clean Toilet Seat)

टॉयलेट सीटवर जीवघेणे रोगजंतू मोठ्या प्रमाणात असतात. यापासून होणाऱ्या गंभीर आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी टॉयलेट सीटची स्वच्छता (Hygiene Tips) करणे अतिशय गरजेचं आहे. टॉयलेट सीटचा वापर करण्यापूर्वी तसंच वापर केल्यानंतरही सीट सॅनिटाइजरने स्वच्छ करावी.

55
हातही स्वच्छ करावे
Image Credit : Getty

हातही स्वच्छ करावे

शौचालयाचा वापर केल्यानंतर तुमचे शरीर किती जंतूंच्या संपर्कात येते, हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळे शौचास जाऊन आल्यानंतर संपूर्ण शरीराची योग्य पद्धतीने स्वच्छता करणे आवश्यक आहे. टॉयलेटचा वापर केल्यानंतर लगेचच हात-पाय साबणाने स्वच्छ (Hand Sanitization Tips) धुवावेत.

आणखी वाचा :

Men Health Tips : पुरुषांनो शारीरिक-मानसिक थकवा दूर करायचाय? नियमित करा हे सोपे व्यायाम

International Men’s Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आहे? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

International Men's Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त वडील, भाऊ व मित्रांना हे मेसेज पाठवून द्या शुभेच्छा

About the Author

HS
Harshada Shirsekar
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved