MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • International Men’s Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आहे? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

International Men’s Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आहे? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

Happy International Men’s Day 2023 : जगभरात दरवर्षी 19 नोव्हेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास व महत्त्व… 

2 Min read
Harshada Shirsekar
Published : Nov 17 2023, 08:45 PM IST| Updated : Nov 19 2023, 10:14 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
International Men’s Day 2023
Image Credit : Getty

International Men’s Day 2023

Happy International Men’s Day 2023 : समाजात महिला आणि पुरुष दोघांचंही स्वतंत्र असे महत्त्व आहे. या दोघांशिवाय हे जग अपूर्ण आहे. समाजातील महिलांचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ‘महिला दिन’ साजरा केला जातो, तर पुरुषांचे योगदान व त्यांच्या कामगिरीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ‘पुरुष दिन’ही साजरा केला जातो. 

19 नोव्हेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' म्हणूनही ओळखला जातो. पुरुषांचे हक्क व त्यांच्याशी संबंधित अन्य महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल समाजामध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

25
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम (International Men's Day 2023 Theme)
Image Credit : Getty

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम (International Men's Day 2023 Theme)

समाजातील पुरुषांमध्ये होणारे भेदभाव, शोषण, छळ आणि हिंसेविरोधात आवाज उठवणे व पुरुषांना त्यांचे हक्क मिळवून देणे; हा दिवस साजरा करण्यामागे हा मुख्य उद्देश आहे. याव्यतिरिक्त लैंगिक समानतेस (Gender Equality) प्रोत्साहन देणे हा सुद्धा या दिवसाचा उद्देश आहे. दरवर्षी विशिष्ट थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो.

या वर्षी या दिवसाची थीम ‘झीरो मेल सुसाइड’ (Zero Male Suicide Theme For International Men's Day 2023) म्हणजेच जगभरातील पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी करणे आणि त्यांना त्यांचे जीवन संपवण्यापासून रोखणे; ही आहे.

35
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास (International Men's Day 2023 History)
Image Credit : Getty

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास (International Men's Day 2023 History)

सर्वप्रथम वर्ष 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस (International Men's Day) साजरा करण्यात आला होता. वर्ष 1999मध्ये वर्षी वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक Dr Jerome Teelucksingh यांनी या दिवशी आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. त्याच दिवशी सिंह यांनी पुरुषांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे व त्यांचे सकारात्मक गुण सर्वांसमोर आणण्यासाठी लोकांना प्रेरित केले. तेव्हापासून हा दिवस जगभरात दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' (International Men's Day 2023) म्हणून साजरा केला जाऊ लागला.

45
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2023 साजरा करण्यामागील उद्देश (Purpose of celebrating International Men's Day 2023)
Image Credit : Getty

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2023 साजरा करण्यामागील उद्देश (Purpose of celebrating International Men's Day 2023)

आपल्या भारत देशामध्ये वर्ष 2007 मध्ये पहिल्यांदा ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ साजरा करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे पुरुषांचे सकारात्मक गुण, आरोग्य आणि संघर्षाशी संबंधित माहिती लोकांसमोर आणणे. समाजात पुरुषांसोबत होणाऱ्या भेदभावावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी नागरिकांना महिला आणि पुरुष दोघांचे महत्त्व सांगितले जाते. तसंच त्यांच्यात होणाऱ्या भेदभावाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

55
Happy International Men's Day 2023
Image Credit : Getty

Happy International Men's Day 2023

पुरुष होणे सोपे नाही

सगळं सहन करून

दुःख लपवावे लागते

डोळ्यांत अश्रू असतानाही

चेहऱ्यावर हसू ठेवावे लागते

परिस्थिती कशीही असो

त्याला कुठे मिळतोय आराम

संघर्षच पुरुषाचे आहे दुसरे नाव

कमकुवत असणे-दिसणे याचे काम नाही

कारण पुरुष होणे इतके सोपे नाही

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा :

International Men's Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त वडील, भाऊ व मित्रांना हे मेसेज पाठवून द्या शुभेच्छा

How To Grow Cardamom Plant : वेलचीच्या रोपाची घरात कशी करावी लागवड? जाणून घ्या सोपी पद्धत

सुब्रत रॉय-स्वप्ना यांच्या प्रेमकहाणीसमोर फिल्मी प्रेमकथाही ठरेल फेल

About the Author

HS
Harshada Shirsekar
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved