- Home
- lifestyle
- Men Health Tips : पुरुषांनो शारीरिक-मानसिक थकवा दूर करायचाय? नियमित करा हे सोपे व्यायाम
Men Health Tips : पुरुषांनो शारीरिक-मानसिक थकवा दूर करायचाय? नियमित करा हे सोपे व्यायाम
- FB
- TW
- Linkdin
पुरुषांनो, आरोग्याची काळजी घेताय का?
Men Health Tips In Marathi : पुरुष मंडळींनाही व्यस्त वेळापत्रकातून पुरेशा प्रमाणात आराम करण्यासाठी वेळ मिळत नाहीत. विश्रांती न घेता केवळ कामच करत बसलात तर शरीरावरील ताण वाढू शकतो. यामुळे शारीरिक थकवा-आळस येणे, एकाग्रतेवर परिणाम होणे, कोणत्याही कामात मन न रमणे यासारख्या समस्या उद्भवतात.
शारीरिक-मानसिक आरोग्य निरोगी (Health Tips News In Marathi) ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करणे व पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचे कार्य सुरळीतपणे सुरू राहण्यास नक्कीच मदत मिळेल. यासाठी नियमित काही सोपे उपाय केल्यास आरोग्यास कित्येक फायदे मिळू शकतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
मेडिटेशन
शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर मेडिटेशन (Meditation Tips) म्हणजे ध्यानधारणा करणे हा सोपा व सर्वोत्तम उपाय आहे. केवळ 30 मिनिटे मेडिटेशन केल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे शरीरातील सूस्ती, आळस व थकाव देखील दूर होण्यास मदत मिळते.
कोवळ्या उन्हात वॉक करणे
दररोज सकाळी कोवळ्या उन्हात वॉक केल्यास शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ (Vitamin D) मिळते. व्हिटॅमिन डीमुळे शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती होते. ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत मिळते. सेरोटोनिनला (Serotonin Hormone) हॅपी हार्मोन असेही म्हणतात. हे हार्मोन तुमचा मूड, झोप, भूक, स्मरणशक्तीशी संबंधित कार्ये नियंत्रित करण्याचे काम करते.
व्यायाम करणे आवश्यक
शारीरिक क्षमता (Physical Strength) वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होण्यास मदत मिळेल. मुख्यतः शारीरिक थकवा कमी होईल. नियमित केवळ 30 मिनिटे जरी व्यायाम केला तरी रक्तप्रवाहासह संपूर्ण शरीराचे कार्य सुधारण्यास मदत मिळेल.
मित्रमैत्रिणी-नातेवाईकांना भेटा
कामामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी वेळ काढून आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच नातेवाईकांना भेटा. यामुळे तुमचे नातेसंबंधही चांगले राहतील व ताणही कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय तुमचा मूड देखील चांगला होईल. वारंवार भेटीगाठी करणे शक्य नसल्यास मेसेजच्या माध्यमातून किंवा कॉल करून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता.
शांत गाणी किंवा संगीत ऐका
थकवा किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास एखादे शांत गाणे किंवा संगीत ऐकावे. यामुळे मेंदूमध्ये सुरू असलेला गोंधळ शांत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचा मूड देखील चांगला होईल. तुमची चिडचिड शांत झाल्याने चांगली झोप देखील येईल.
आणखी वाचा
International Men’s Day 2023 : आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आहे? जाणून घ्या इतिहास व महत्त्व
Subrata Roy : सुब्रत रॉय यांचे या सायलेंट किलर आजारामुळे झाले निधन
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.