सार

World Environment Day 2024 : पावसाळ्यात रोपांची काळजी घेणे अत्यावश्यक असते. खरंतर, पावसाळ्यात रोपट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने टवटवीत राहतात. पण अत्याधिक प्रमाणात पाणी रोपांना मिळाल्यास त्यांचे नुकसान देखील होऊ शकते.

Plant Care Tips in Monsoon : पावसाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे सुकलेली झाडे-रोपटी पावसाच्या सरींनी पुन्हा हिरवीगार होतील. याशिवाय घरातील रोपांची छाटनी केली असल्यास पावसाळ्यात त्याला नवी पालवी फुटू शकते. पण पावसाळ्यात रोपांची योग्य काळजी न घेतल्यास त्यांचे नुकसान देखील होऊ शकते.

खरंतर, पावसाळा रोपांच्या वाढीसाठी योग्य काळ असल्याचे मानले जाते. पण पावसाळ्यात कधीकधी रोपांना कीड लागणे, रोपाच्या कुंडीत अत्याधिक पाणी जमा होणे अशा काही गोष्टी झाल्याने रोपांचे नुकसान होऊ शकते. यामुळेच पावसाळ्यात घरातील रोपांची काळजी कशी घ्यायची याबद्दलच्या सोप्या टिप्स जाणून घेऊया सविस्तर....

योग्य जागेची निवड
पावसाळ्यात घरातील रोपटी ठेवण्यासाठी योग्य आणि सुरक्षित जागेची निवड करावी. ज्या ठिकाणी रोप ठेवणार आहात तेथे पुरेशा प्रमाणात पाणी, हवा रोपांना मिळेल याची काळजी घ्यावी. अत्याधिक पाणी कुड्यांमध्ये पडेल अशा ठिकाणी रोपटी ठेवू नयेत.

पाण्याच्या प्रमाणावर लक्ष द्या
पावसाळ्यावेळी रोपांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. पण कुंड्यांमध्ये अत्याधिक प्रमाणात पाणी साठल्यास रोपट्यांच्या मूळांचे नुकसान होऊ शकते. यामुळे रोपट्यांची वाढ खुंटली जाऊ शकते. अशातच पावसाळ्यात रोपट्यांकडे लक्ष द्यावे.

किड्यांपासून करा बचाव
पावसाळ्यात रोपांना कीड लागण्याची देखील शक्यता असते. अशातच रोपट्यांच्या कुड्यांमध्ये वेळोवेळी किटकनाशक खत टाकावे. अथवा रोपट्यांमध्ये साचणाऱ्या पाण्याकडे लक्ष द्यावे.

पावसाळ्यात रोपट्यांची काळजी
पावसाळ्यात घरातील रोपट्यांची काळजी घेताना त्यावर आठवड्यातून एकदा तरी किटकनाशकांची फवारणी करा. यामुळे रोपांना कीड लागणार नाही. घराबाहेर रोपटी असल्यास त्यावर प्लास्टिकच्या पिशवीला छिद्र करुन ती रोपांना गुंडाळावी. यामुळे रोपांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत राहिल आणि अत्याधिक पाणी देखील कुड्यांमध्ये साचणार नाही.

हवेशीर आणि मोकळ्या जागेत ठेवा
पावसाळ्यात रोप हवेशीर आणि मोकळ्या जागेत ठेवा. जेणेकरुन रोपट्यांना पुरेशा प्रमाणात प्रकाश देखील मिळेल. याव्यतिरिक्त गरज भासल्यास रोपट्यांवर किटकनाशकांची फवारणी करू शकता.

जागतिक पर्यावरण दिवस
आज (5 जून) जगभरात जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी पर्यावरणासंबंधित समस्यांबद्दल जगभरात जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. याशिवा जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षीची जागतिक पर्यावरणाची थीम 'आपली भूमी' आहे. 

आणखी वाचा : 

चहाला सुगंध देणाऱ्या वेलचीचे रोप घरी कसे वाढवायचे ? जाणून घ्या टिप्स

जून महिन्यात 10K मध्ये फिरता येतील ही ठिकाणे, नक्की भेट द्या