- Home
- lifestyle
- Relationship Guide : कोणत्या कारणांमुळे वय झाल्यावरही मुली लग्न टाळतात? कायम नाहीच म्हणतात?
Relationship Guide : कोणत्या कारणांमुळे वय झाल्यावरही मुली लग्न टाळतात? कायम नाहीच म्हणतात?
मुंबई - लग्न झाल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलतं. लग्नापूर्वी असलेलं स्वातंत्र्य लग्न झाल्यावरही तसंच राहील याची काहीच खात्री नसते. म्हणूनच अनेक मुली लग्न न करता एकट्या राहण्याचा विचार करतात. जाणून घ्या इतरही कारणे.

मुलींमध्ये असा बदल का झाला?
प्रत्येक मुलीला लग्नाविषयी खूप स्वप्ने असतात. तिला खूप प्रेम करणारा, चांगला नवरा मिळावा असे वाटते. आपले लग्न असे व्हावे, तसे व्हावे अशी त्या कल्पना करतात. पण… हे सगळं जुन्या काळचं होतं. आता मात्र मुलींची विचारसरणी पूर्ण बदलली आहे. इतरांवर अवलंबून राहायचं हे त्यांना पटत नाही. थेट प्रश्न विचारतात, लग्न करायचंच कशाला..? आम्ही पण नोकरी करतो, आमच्या पायावर उभ्या राहू शकतो, मग दुसऱ्याची सेवा करत का जगायचं? म्हणून सरळ सांगून टाकतात की लग्नात त्यांना अजिबात रस नाही. पण असा बदल का झाला? मुली लग्न करण्यास का तयार होत नाहीत? ते पाहूया…
स्वातंत्र्याची इच्छा
पूर्वीच्या काळी मुली आर्थिकदृष्ट्या लग्नाआधी आईवडिलांवर आणि लग्नानंतर नवऱ्यावर अवलंबून असायच्या. पण आत्ताच्या मुली तसं जगणं मान्य करत नाहीत. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे. चांगले शिक्षण घेऊन, उत्तम कंपन्यांमध्ये नोकरी करतात. कुणावरही आर्थिक अवलंबित्व नाही. लग्न न करता देखील आम्ही आनंदाने राहू शकतो, असा आत्मविश्वास आहे. म्हणूनच लग्नात त्यांना फारसा इंटरेस्ट नाही. शिवाय, लग्न झाल्यावर आपल्याला हवं तसं जगता येणार नाही, दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये राहावं लागेल, अशी भीती त्यांना वाटते.
करिअरला प्राधान्य
आता मुली पूर्वीपेक्षा जास्त शिक्षित झाल्या आहेत. त्यामुळे करिअरमध्ये यशस्वी व्हायची त्यांची मोठी इच्छा आहे. अनेक मुली आधी करिअरमध्ये स्थिर व्हायचं, मग बाकी विचार करायचा, असं ठरवतात. लग्न झालं की करिअर थांबेल, अशी भीती त्यांना असते. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत त्यांना अजिबात उत्साह नाही.
घटस्फोटाची भीती
आजकाल लग्न जितकं सहज होतंय, तितकंच सहज तुटतंयही. घटस्फोटाचे प्रमाण सतत वाढतंय. आयुष्यभर एकत्र राहू शकत नाहीत म्हणून सहज घटस्फोट घेणाऱ्यांना पाहून मुलींचा दृष्टीकोन बदललाय. मग त्यांना वाटतं यातलं काही खरं नाही, मग लग्न करायचंच कशाला? एकटं राहणं बरा पर्याय आहे. त्यामुळे लग्नाविषयी आकर्षण कमी झालंय.
घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण
लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात. ती नोकरी करणारी असो वा गृहिणी, घरकाम, कुटुंबातील सगळ्यांच्या गरजा भागवणं हे कोडगिरीचं कर्तव्य समजलं जातं. या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त मुलींनीच का उचलायच्या? हा प्रश्न त्यांना पडतो. आणि म्हणूनच त्या लग्नापासून दूर राहतात.
सामाजिक हस्तक्षेप
लग्नानंतर "कोणते कपडे घालायचे?", "मुलं कधी होणार?" असे प्रश्न वारंवार मुलींच्या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण करतात. लग्नानंतर समाजाचा हस्तक्षेप त्यांच्या आयुष्यात वाढतो. त्यामुळे वैयक्तिक जागा कमी होते, असं त्यांना वाटतं. म्हणून त्या लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेतात.
