कमी पाणी पिल्यास होईल त्वचेचा हा रोग, हिवाळ्यात किती पाणी प्यायला हवं?
थंडीत तहान कमी लागत असली तरी शरीराला रोज २.५ ते ३ लिटर पाण्याची गरज असते. कोमट पाणी प्यायल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा तजेलदार राहते. थकवा, डोकेदुखी ही पाणी कमी असल्याची लक्षणे असू शकतात.

कमी पाणी पिल्यास होईल त्वचेचा हा रोग, हिवाळ्यात किती पाणी प्यायला हवं?
थंडीत तहान कमी लागत असते, त्यावेळी पाणी प्यायची इच्छा होत नाही. पण शरीराला पाण्याची गरज लागत नाही. २.५ ते ३ लिटर पाणी रोज प्यायला हवं, ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं.
व्यायाम करणाऱ्यांसाठी पाणी आवश्यक
व्यायाम करणाऱ्या लोकांनी पाणी प्यायला हवं. आपण जिमला जात असाल तर तिथं गेल्यानंतर आठवणीन पाणी घेऊन जात जा, त्यामुळं व्यायाम करताना आपल्याला दम लागणार नाही.
गरम पाणी प्या
थंडीत आपण कोमट पाणी प्यायला हवं. गरम पाणी पिल्यास पचन सुधारत आणि सर्दी खोकला कमी होत जाते. गरम पाणी पिल्यावर शरीर ताजेतवाने होतं.
पाणी कधी प्यायला हवं?
आपण हिवाळ्यात उठल्यावर २ ग्लास पाणी प्या. जेवणाआधी आणि व्यायामानंतर आपण पाणी प्यायला हवं. झोपण्याच्याआधी १ ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवं.
पाणी कमी पडल्याची लक्षण जाणून घेऊयात?
पाणी कमी पडल्याची लक्षण आपल्याला जाणवत राहतात. थकवा, डोकेदुखी, ओठ कोरडे आणि बद्धकोष्ठता असे आजार जाणवत राहतात. हि लक्षण पाणी कमी पडल्याची जाणवत राहतात.
पाण्याचे फायदे जाणून घेऊयात
पाणी आपण प्यायला लागल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढायला लागते. त्वचा तजेलदार राहते आणि मेटॅबॉलिझम वाढायला सुरुवात होते.

