MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Waking Up At 3 AM : पहाटे ३ वाजता जाग येते आणि झोप उडते? मग फोन पाहण्याऐवजी 'या' ६ ट्रिक्स वापरा!

Waking Up At 3 AM : पहाटे ३ वाजता जाग येते आणि झोप उडते? मग फोन पाहण्याऐवजी 'या' ६ ट्रिक्स वापरा!

रात्री अचानक जाग येते आणि मग कितीही प्रयत्न केला तरी झोप लागत नाही? अशा वेळी तुम्हीही मोबाईल किंवा घड्याळ पाहता का? झोपेच्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ६ सोप्या ट्रिक्स नक्की वापरून पाहा, लगेच झोप लागेल.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 27 2026, 09:53 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
झोपेच्या तज्ज्ञांचा (Sleep Experts) सोपा उपाय
Image Credit : pinterest

झोपेच्या तज्ज्ञांचा (Sleep Experts) सोपा उपाय

रात्री गाढ झोपेत असताना अचानक जाग येते आणि घड्याळात पाहिलं तर बरोबर ३ वाजलेले असतात! त्यानंतर कितीही कुशी बदलल्या तरी झोप येत नाही. हा अनुभव बहुतेकांना येतो. तज्ज्ञांच्या मते, "रात्रीच्या पहिल्या प्रहरात झोपेचा दबाव (Biological Sleep Drive) जास्त असतो. पण पहाटे ३ च्या सुमारास हा दबाव कमी होतो आणि आपला मेंदू लवकर जागा होण्याच्या स्थितीत येतो." पहाटे ३ वाजता जाग आल्यावर पुन्हा लगेच झोपण्यासाठी तज्ज्ञांनी ६ सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
१. 'बॉडी स्कॅन' (Body Scan) करा
Image Credit : Gemini

१. 'बॉडी स्कॅन' (Body Scan) करा

मनात नको ते विचार येत असतील तर 'बॉडी स्कॅन' हे सोपं ध्यान करा.
डोळे मिटा आणि पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा.
प्रत्येक अवयवाचे स्नायू रिलॅक्स होत आहेत असा विचार करा. ही पद्धत तुम्हाला विचारांच्या चक्रातून बाहेर काढते आणि मेंदूला शांत करते.

Related Articles

Related image1
Empty Stomach Foods : सकाळी रिकाम्या पोटी काय खावं आणि काय टाळावं?
38
२. घड्याळाकडे अजिबात पाहू नका (Don't Check the Time)
Image Credit : pinterest

२. घड्याळाकडे अजिबात पाहू नका (Don't Check the Time)

जाग आल्यावर आपण सर्वात आधी वेळ पाहतो. पण यामुळे आपली चिंता दुप्पट वाढते. "आता झोपायला फक्त २ तास उरलेत" असा हिशोब मेंदू करू लागतो आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. त्यामुळे बेडजवळील घड्याळ उलटे ठेवा आणि मोबाईल हाताला लागणार नाही असा दूर ठेवा.

48
३. बेडवर तळमळत पडू नका, बाहेर या (Get Out of Bed)
Image Credit : Asianet News

३. बेडवर तळमळत पडू नका, बाहेर या (Get Out of Bed)

खूप वेळ झोप येत नसेल आणि तुम्ही बेडवरच पडून राहिलात तर चिडचिड वाढते.
बेडवरून उठा, मंद प्रकाश असलेल्या दुसऱ्या खोलीत जा आणि एखादं पुस्तक वाचा.
जेव्हा पुन्हा झोप येऊ लागेल तेव्हाच बेडवर परत या. (आपल्या मेंदूला बेड ही 'झोपेची जागा' वाटली पाहिजे, 'चिंता करण्याची जागा' नाही).

58
४. मोबाईल स्क्रीन पाहण्याचा मोह टाळा
Image Credit : pinterest

४. मोबाईल स्क्रीन पाहण्याचा मोह टाळा

झोप येत नाही म्हणून फोन काढून रील्स पाहणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे.
स्मार्टफोनमधून येणारा निळा प्रकाश (Blue Light) मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती रोखतो. यामुळे मेंदूला 'आता दिवस उजाडलाय' असा चुकीचा संदेश जातो. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव स्क्रीन पाहू नका.

68
५. रात्रीच्या विचारांना फार गांभीर्याने घेऊ नका
Image Credit : pinterest

५. रात्रीच्या विचारांना फार गांभीर्याने घेऊ नका

पहाटे ३ वाजता आपल्या मेंदूची तार्किक क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे त्या वेळी येणारे विचार किंवा भीती वास्तवापेक्षा जास्त भयानक वाटतात. "हा प्रश्न मी उद्या सकाळी सोडवेन, आता नाही" असं मनाला सांगा आणि ते विचार बाजूला ठेवा.

78
६. 'बॉक्स ब्रीदिंग' (Box Breathing) व्यायाम
Image Credit : pinterest

६. 'बॉक्स ब्रीदिंग' (Box Breathing) व्यायाम

श्वासोच्छवासाचा वेग कमी केल्याने मज्जासंस्था लगेच रिलॅक्स होते.
४ सेकंद दीर्घ श्वास घ्या (Inhale).
४ सेकंद श्वास रोखून धरा (Hold).
४ सेकंद श्वास हळूहळू बाहेर सोडा (Exhale).
पुन्हा ४ सेकंद श्वास न घेता तसेच राहा (Hold). हे चक्र ४-५ वेळा रिपीट केल्यास आपोआप झोप लागते.

88
गाढ झोपेसाठी जीवनशैलीचे नियम
Image Credit : chatgpt

गाढ झोपेसाठी जीवनशैलीचे नियम

सकाळचे ऊन: दिवसाच्या सुरुवातीला कोवळ्या उन्हात गेल्याने शरीराचे जैविक घड्याळ (Circadian Rhythm) सुरळीत राहते.
दुपारनंतर कॉफी/चहा नको: कॅफीनचा प्रभाव शरीरात जास्त काळ टिकतो, त्यामुळे दुपारनंतर कॉफी पिणे टाळा.

अल्कोहोल टाळा: अल्कोहोलमुळे सुरुवातीला झोप येत असली तरी, मध्यरात्री जाग येण्याची शक्यता वाढते.

खोलीतील वातावरण: तुमची बेडरूम थंड, अंधारी आणि शांत असली पाहिजे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Horoscope 27th September 2026 : आज 'या' राशीच्या लोकांनी काही बाबतीत मोठ्यांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल, 12 राशींचं भविष्य काय?
Recommended image2
Mouth Ulcers : तोंडातील अल्सरने हैराण आहात? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Recommended image3
Headache Relief : भयंकर डोकेदुखी सतावतेय? हे ड्रिंक्स प्या आणि लगेच आराम मिळवा!
Recommended image4
Trending Womens Tops : फॅशन जगतात हे ५ टॉप्स डिझाईन्स आहेत ट्रेंडिंग, तुमची पसंती कोणती?
Recommended image5
Black Grapes Benefits : काळ्या द्राक्षांचे ८ भन्नाट फायदे, तुम्हाला माहिती आहेत का?
Related Stories
Recommended image1
Empty Stomach Foods : सकाळी रिकाम्या पोटी काय खावं आणि काय टाळावं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved