Health Tips : सावधान! तुम्ही चुकीच्या वेळी पपई खाताय का?

| Published : Dec 14 2023, 02:07 PM IST / Updated: Dec 14 2023, 02:14 PM IST

papaya

सार

Papaya Health Benefits : पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. पण या फळापासून शरीरास योग्यरित्या लाभ मिळावेत, यासाठी ते सेवन करण्याची योग्य वेळ माहिती आहे का?

 

Papaya Health Benefits In Marathi : पपई या फळामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्सचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीरात होणाऱ्या जळजळीची समस्या कमी होते आणि संपूर्ण शरीरास पोषणतत्त्वांचाही पुरवठा होतो. या फळातील पोषकघटकांमुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता व हायपर अ‍ॅसिडिटीच्या समस्येतूनही सुटका होण्यास मदत मिळते.

तसेच यातील अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्मामुळे शरीरातील अवयवांना येणारी सूजही कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त पपईच्या सेवनामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते, कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. पण या फळाचे सेवन करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का?

पपईचे सेवन करण्याची योग्य वेळ

रिकाम्या पोटी पपईचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. विशेषतः सकाळच्या वेळेस पपई खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. कारण याद्वारे आपले शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. याव्यतिरिक्त चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येऊन मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. तसेच वृद्धत्वाची लक्षणेही कमी करण्यामध्ये पपईतील पोषक घटक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

पपईचे सेवन कोणी करू नये?

गर्भवती महिला : पपईतील लेटेक्स घटकामुळे गर्भवती महिलांना या फळाचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे रक्तस्राव तसेच अकाली प्रसूतीचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता असते.

हृदयविकाराचे रुग्ण : हृदयाचे अनियमित ठोके असणाऱ्या रुग्णांनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो, कारण पपईमधील सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स हे घटक कमी प्रमाणातही पचनप्रक्रियेच्या संपर्कात येताच, त्यावेळेस शरीरात हायड्रोजन सायनाइड या केमिकल कम्पाउंडची निर्मिती होऊ शकते.

लेटेक्स अ‍ॅलर्जी : लेटेक्स अ‍ॅलर्जीची समस्या असणाऱ्या रुग्णांनाही पपईचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते.

कमी रक्तदाबाची समस्या असणारे रुग्ण : शरीरात रक्तशर्करेची पातळी कमी असणारे किंवा हायपोग्लायसेमियाची समस्या असणाऱ्या रुग्णांना पपई खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामागील मुख्य कारण म्हणजे या फळातील घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असते. यामुळेच अशा रुग्णांना पपईचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो.

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतात या छोट्याशा बिया? रीसर्चमधील मोठी माहिती

50 हजार रूपयांमध्ये करा परदेशवारी, ही आहेत सर्वात स्वस्त-मस्त ठिकाणं