सार

ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित करण्यात आलेल्या रीसर्चमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या खाद्यपदार्थाचा आहारात समावेश केल्यास संपूर्ण शरीराला मोठ्या प्रमाणात लाभ मिळतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Breast Cancer : अळशीच्या बिया (Flaxseed) हे एक सुपरफुड म्हणून ओळखले जाते. यामध्ये आरोग्यास फायदेशीर असणाऱ्या कित्येक पोषणतत्त्वांचा मोठा साठा आहे. अळशीच्या बियांमध्ये शरीरासाठी पोषक असणारे प्रोटीन, फायबर, फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. आयुर्वेदिक उपचारांमध्येही या बियांचा समावेश केला जातो. दरम्यान अळशीच्या बियांच्या सेवनामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो, अशी माहिती नुकत्याच करण्यात आलेल्या एका रीसर्चमध्ये नमूद केली गेली आहे.

मेयो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, अळशीच्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडसह लिग्नेन नावाचे प्लाँट बेस्ड कम्पाउंडचे प्रमाण खूप जास्त असते. या कम्पाउंडमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते. मायक्रोबायोलॉजी स्पेक्ट्रम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, अळशीतील लिग्नेन हे कम्पाउंड आतड्यामधील सूक्ष्मजीव व स्तन ग्रंथी मायक्रोआरएनए (miRNAs) यांच्यातील परस्पर संबंध प्रभावित करण्यासाठी दर्शवले गेले आहेत, जे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ व हा आजार शरीरात फैलावणाच्या प्रक्रियेतील जनुकांवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य करतात.

नेब्रास्का-लिंकन विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. जेनिफर ऑचतुंग (Dr. Jennifer Auchtung) म्हणाले की, 'गॅस्ट्रोइंटस्टाइनल मायक्रोबायोटा हे मानवी आरोग्य प्रभावित करण्यासाठी आपल्या आहारातील कित्येक घटकांमध्ये बदल करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अळशीच्या बिया या समृद्ध स्वरुपातील आहार आहे. यातील पोषक घटक शरीरात विकसित होऊ पाहणाऱ्या कर्करोगाच्या पेशींवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य करतात.

अळशीच्या सेवनाचे फायदे

अळशीच्या सेवनामुळे शरीराच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत मिळते. अळशीच्या बिया वाटून किंवा बिया चावून खाल्ल्यासही फायदे मिळतात. या बियांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे हृदयविकारांशी संबंधित धोका कमी होऊ शकतो.

अळशीच्या बियांचे सेवन करण्याची पद्धत

  • ब्रेकफास्टमधील खाद्यपदार्थांमध्ये एक चमचा अळशीची पावडर मिक्स करा.
  • एक वाटी दह्यामध्ये एक मोठा चमचा अळशीची पावडर मिक्स करा.
  • कुकीज्, मफिन, ब्रेड किंवा अन्य बेकरी प्रोडक्ट्समध्ये अळशीची पावडर मिक्स करू शकता.
  • हलक्या स्वरुपात अळशीच्या बिया भाजा व आवश्यकतेनुसार आहारामध्ये या बियांचा समावेश करावा

 तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

50 हजार रूपयांमध्ये करा परदेशवारी, ही आहेत सर्वात स्वस्त-मस्त ठिकाणं

DRY CLEANचा खर्च टाळायचाय? घरच्या घरी असा स्वच्छ धुवा ओव्हरकोट

Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध