Vastu Tips : घरात चुकूनही लावू नका या प्रकारच्या पेंटिंग, अन्यथा...

| Published : Dec 12 2023, 04:04 PM IST

Vastu Tips

सार

Vastu Tips : घराच्या सजावटीसाठी आपण काही फोटो किंवा पेंटिंग खरेदी करतो. काहीजण घरात अशा प्रकारचे पेंटिंग लावतात ज्या वास्तुशास्रातनुसार अशुभ मानल्या जातात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Vastu Tips for Home : प्रत्येकजण आपले घर सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घरात आणतात. जसे- पेटिंग, फोटो अथवा डिझाइनर घड्याळ. पण तुम्हाला माहितेय का, वास्तुशास्रानुसार काही पेंटिंग घरात लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक उर्जा वाढली जाते.

घर सजवण्यासाठी तुम्ही आवडलेले एखादे पेटिंग आणण्याचा विचार करताय तर थांबा. कारण वास्तुशास्रानुसार, काही पेटिंग घरात लावणे टाळणे पाहिजे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

हिंस्र प्राण्यांचे पेंटिंग
वास्तुशास्रानुसार, घरात कधीच हिंस्र प्राण्यांचे (Ferocious Animals) पेटिंग लावू नये. या फोटोंमुळे घरात नकारात्मक उर्जा वाढली जाते. याशिवाय चिडचिड होणे आणि घरात भांडण होऊ शकतात.

सूर्यास्ताचे पेटिंग
उगवत्या सूर्याचे पेंटिंग बहुतांशजण घरात लावतात. या पेंटिंग घरातील भितींवर सुंदर दिसतात. पण काहीजण उगवत्या सूर्याऐवजी सूर्यास्ताचे (Sunset) पेटिंग लावतात. सूर्यास्ताचे पेटिंग घरात लावणे वास्तुशास्रानुसार अशुभ मानले जाते. याशिवाय घरात नकारात्मकता वाढण्यास तुम्ही सतत निराश राहता.

पूर्वजांचे फोटो
घरात तुम्ही पूर्वजांचे फोटो लावता का? (Ancestors Photos) पण वास्तुशास्रात, पूर्वजांचे फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील शांतता भंग पावते. याशिवाय घरात नकारत्मक उर्जा वाढली जाते.

महाभारताचे पेंटिंग
महाभारताच्या युद्धाचे पेंटिंग घरात कधीही लावू नका. वास्तुशास्रानुसार, महाभारताचे पेंटिंग लावल्याने घरात अशांतता निर्माण होते आणि वाद-भांडण सतत होत राहतात.

वाहते पाणी
घरात चुकूनही वाहत्या पाण्याचे पेंटिंग लावू नका. यामुळे आर्थिक नुकसान होते आणि तुमचे पैसे पाण्यासारखे खर्च होतात.

कोणत्या पेंटिंग लावाव्यात?
घरातील भिंतींवर सकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या पेंटिंग लावाव्यात. जेणेकरून तुमच्यावर त्या पेंटिंगचा सकारात्मक प्रभाव होईल. घरात नेहमीच निसर्गाचे फोटो, पेंटिंग लावावेत. याशिवाय बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावणे वास्तुशास्रानुसार शुभ मानले जाते.

तसेच हिंदू धर्मात धनाची देवी मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीचा (Lord Lakshmi) फोटो किंवा पेंटिंग घरात लावू शकता. यामुळे घरात आर्थिक भरभराट कायम होत राहिल. घराच्या उत्तर दिशेला कुबेर किंवा देवी लक्ष्मीचा फोटो लावावा, हे वास्तुशास्रात सांगितले गेले आहे. पण फोटो किंवा पेंटिंगमध्ये देवी बसलेली असावी. यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Vastu Tips : किचनमधील ही भांडी पालथी ठेवणे मानले जाते अशुभ

Money Attraction Tips: आर्थिक तंगीचा सामना करताय? नव्या वर्षात करा हे उपाय, होईल धनलाभ

Plants for Good Luck : नव्या वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी घरात लावा हे रोप