Money Attraction Tips: आर्थिक तंगीचा सामना करताय? नव्या वर्षात करा हे उपाय, होईल धनलाभ

| Published : Dec 09 2023, 06:37 PM IST / Updated: Dec 09 2023, 06:53 PM IST

Financial Problem
Money Attraction Tips: आर्थिक तंगीचा सामना करताय? नव्या वर्षात करा हे उपाय, होईल धनलाभ
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Money Problem: व्यक्तीच्या वाईट सवय घरात आर्थिक तंगीचे कारण ठरू शकते. या सवयींमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. यामुळे व्यक्तीला पैशांसंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागतो. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Financial Problem: तुम्ही घरात आर्थिक तंगीचा सामना करताय? कितीही मेहनत केली तरीही पैसा हातात टिकत नाही? खरंतर यामागे काही कारणे असू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे तुमच्या वाईट सवयी. अंगी असलेल्या वाईट सवयींमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि व्यक्तीला धनासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

नव्या वर्षात आर्थिक तंगीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही उपाय करू शकता. तत्पूर्वी अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते हे पाहूयात.

उशिरापर्यंत झोपणे
धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरातील मंडळी सकाळी उशिरापर्यंत झोपतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी नाराज होते. यामुळे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. आंघोळ केल्यानंतर देवी-देवतांची पूजा करावी.

घरात अस्वच्छता असणे
देवी लक्ष्मी अशा घरात कधीच वास करत नाही, जेथे अस्वच्छता असते. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असल्यास घरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या.

खरकटी भांडी ठेवू नका
रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

हे उपाय करा

-वेलची
आर्थिक तंगीचा सामना करत असल्यास 2024 पूर्वी आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला पाच वेलची अर्पण करा. अथवा वेलची लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. यामुळे आर्थिक तंगीच्या समस्येपासून दूर रहाल.

-तांदूळ
नव्या वर्षाच्या सुरुवातीपूर्वी धनाची देवता असलेल्या लक्ष्मीला तांदूळ अर्पण करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. थोडेसे तांदूळ पर्समध्ये ठेवल्यास पाकिटात पैशांची कमतरता कधीच निर्माण होणार नाही.

-चांदीचे नाणे
चांदीचे नाणे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. यासाठी तुम्ही 2024 या नवं वर्षाच्या आधी चांदीचे नाणे देवी लक्ष्मीच्या पायाशी अर्पण करू शकता. अथवा चांदीचे नाणे आपल्या तिजोरीत, पर्स मध्ये ठेवू शकता.

कवड्या
2024 च्या आधी शुक्रवारी धनाची देवता असणाऱ्या देवी लक्ष्मीला चार पिवळ्या कवड्या अर्पण करून त्या लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक तंगीच्या समस्येपासून दूर राहाल.

कनकधारा स्त्रोत्र वाचा
घरातील आर्थिक तंगीची समस्या दूर करण्यासाठी कनकधारा स्त्रोत्र वाचा. दररोज कनकधारा स्त्रोत्र वाचल्याने धनलाभ होतो आणि धनासंबंधित सर्व समस्या दूर होतात.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

50 हजार रूपयांमध्ये करा परदेशवारी, ही आहेत सर्वात स्वस्त-मस्त ठिकाणं

Health Advice: सावधान! वारंवार साबणाने हात धुताय? होऊ शकतो त्वचेचा हा गंभीर आजार

Video: जन्मत: हात नाहीत, उत्तमरित्या पायाने चालवते कार; केरळच्या तरुणीची प्रेरणादायी कथा