किचनमधील ही भांडी पालथी ठेवणे मानले जाते अशुभ
काही लोक स्वयंपाकघर अस्वच्छ आणि व्यवस्थितीत ठेवत नाही. वास्तुशास्रानुसार, स्वयंपाकघरातील भांडी कधीच अस्वच्छ ठेवू नयेत. खासकरून रात्रीच्या वेळेस. जेवून झाल्यानंतर भांडी धुवावीत.
काही भांडी स्वच्छ किंवा वापरल्यानंतर कधीच पालथी ठेवू नये. कारण ते अशुभ मानले जाते आणि देवी अन्नपूर्णा नाराज होते.
पंडित कौशल मिश्रा यांच्यानुसार, रात्रीच्या वेळेस स्वयंपाकघरात भांडी खुली ठेवू नयेत. जेव्हा पोळ्या बनवता त्यानंतर तवा पालथा ठेवतो. तवा पालथा ठेवणे अशुभ मानले जाते.
काही लोकांची सवय असते पोळ्या बनवल्यानंतर गरम तवा तसाच पालथा ठेवतात. यामुळे घरात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
विशेषज्ज्ञांच्या मते, कढई पालथी ठेवू नये. कारण यामुळे घरात नकारात्मक उर्जा वाढल्या जातात आणि राहु ग्रहाचा प्रभावही वाढला जातो.
घरात वाद आणि भांडणापासून दूर राहण्यासाठी कढईचा वापर केल्यानंतर ती लगेच धुवून जागच्या जागी ठेवावी.
गरम तव्यावर पाणी टाकू नये. यामुळे तव्यावरून निघणाऱ्या वाफेमुळे नकारात्मक उर्जा घरात निर्माण होते. याशिवाय देवी अन्नपूर्णा नाराज होऊ शकते.
पितळ, तांबे, स्टील, कांस्यची भांडी पश्चिम दिशेला ठेवू नयेत. याशिवाय पाण्याचे भांडे, दूधाचे भांडे आणि स्टोरेज करण्यात येणारे कंटेनर किचनमध्ये पालथे ठेवू नयेत.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.