घरातल्या प्रत्येक गोष्टीचा वास्तुशास्त्रावर परिणाम होतो, अगदी फ्रिजचाही. त्यामुळे फ्रिजमध्ये पाणी ठेवण्यासाठी कोणती बाटली वापरावी, प्लास्टिकची की काचेची, याबद्दलही वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

Vastu Tips For Fridge: आजकाल जवळपास प्रत्येक घरात फ्रिजमध्ये पाणी ठेवण्यासाठी बाटल्या वापरल्या जातात. अनेक घरांमध्ये पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा सर्रास वापर होतो. तर काही लोकांना काचेच्या बाटल्या जास्त चांगल्या वाटतात. वास्तुशास्त्रानुसार, पाणी ठेवण्याचं भांडं आणि त्याची दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. मग प्रश्न पडतो की, फ्रिजमध्ये प्लास्टिकची बाटली ठेवणं योग्य आहे की काचेची? चला, वास्तुशास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्लास्टिकच्या बाटलीबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार, प्लास्टिक हा शुद्ध घटक नसून एक कृत्रिम घटक आहे, जो घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतो. प्लास्टिकच्या बाटलीत जास्त वेळ पाणी ठेवल्यास त्याच्या गुणवत्तेवर आणि चवीवर परिणाम होऊ शकतो. अनेकदा या पाण्यात प्लास्टिकचे हानिकारक घटक मिसळले जातात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर चांगला मानला जात नाही.

काचेची बाटली का मानली जाते चांगली?

वास्तुशास्त्रानुसार, काच हा शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा धातू आहे. काचेच्या बाटलीत ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध आणि ऊर्जावान राहतं. काच पारदर्शक असल्यामुळे पाण्यातील घाणही लगेच दिसून येते. याच कारणामुळे वास्तुशास्त्रात काचेच्या बाटलीला शुभ मानलं गेलं आहे.

स्टीलची बाटलीही वापरू शकता

काचेची बाटली वारंवार फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तिचा वापर करणं शक्य नसेल, तर स्टीलची बाटली हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. वास्तुशास्त्रात स्टीलला संतुलन आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. फक्त स्टीलची बाटली रोज स्वच्छ करणं गरजेचं आहे.

पाणी कोणत्या दिशेला ठेवावं?

वास्तुशास्त्रानुसार, पाणी उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमचा फ्रिज घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल याची काळजी घ्या. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या नेहमी स्वच्छ असाव्यात. तुटलेल्या किंवा खराब झालेल्या बाटल्या घरातून लगेच काढून टाकाव्यात.


Disclaimer
या लेखात दिलेली माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांच्या मतांवर आधारित आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी ही माहिती केवळ सूचनेसाठीच घ्यावी.